आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aggressive Farmers Throw District Bank Director's Chair

संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेत व्यवस्थापकाच्या फेकल्या खुर्च्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेत संताप व्यक्त केला. या वेळी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास चौधरी यांनी जिल्हा बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख यांची खर्ची उचलून फेकली.
जळगाव - हवामानावर आधारित पीक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पिंप्राळा सर्कलमधील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी वाजेच्या सुमारास जिल्हा बँक प्रशासनाचा निषेध करत व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयातील खुर्च्यांची फेकाफेक केली. पिंप्राळा सर्कलमधील जिल्हा बँकेच्या ८७९ सदस्य शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरलेली आहे.
मात्र, त्यापैकी केवळ २१७ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हा बँक गाठून व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. या वेळी जितेंद्र देशमुख हे ‘मला समितीला भेटायचे आहे. विमा कंपनीशी बोलतो, असे शेतकऱ्यांना सांगून कार्यालयाबाहेर पडले. मात्र, देशमुख यांच्या उत्तरामुळे शेतकरी अधिकच संतप्त झाले. त्यांनी जिल्हा बँक प्रशासनाचा निषेध करत देशमुख यांच्या कार्यालयातील खुर्च्यांची फेकाफेक केली. त्यानंतर जिल्हा बँकेत घोषणाबाजी करत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या कार्यालयात शेतकरी गेले.

सोनवणे यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पिंप्राळा सर्कलमधील २१७ कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे. जिल्हा बँकेच्या फक्त दोन बिगरकर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली असल्याची माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम भरली नसल्याचा आरोप जिल्हा बँक व्यवस्थापनावर केला. त्याचप्रमाणे शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जिल्हा बँकेकडून आकडेवारी घेतली नाही काय? अशी विचारणाही केली.

सोनवणेंसह शेतकरी जिल्हा बँकेत
कृषीअधिकाऱ्यांसह पिंप्राळा सर्कलमधील शेतकरी व्यवस्थापकीय संचालकांना भेटण्यासाठी पुन्हा जिल्हा बँकेत गेले. तेथे सोनवणे यांनी जिल्हा बँकेने पिंप्राळा सर्कलमधील किती कर्जदार शेतकऱ्यांचा विमा काढलेला आहे? अशी विचारणा केली. त्यावर देशमुख यांनी पिंप्राळा सर्कलमधील ८७९ शेतकऱ्यांचा पीक विमा काढला असल्याची माहिती दिली. मात्र, त्यापैकी केवळ दोन बिगरकर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे. ३१ जुलैला पीक विमा वाटपाची मुदत संपूनही बँक विमा कंपनीत समन्वय नसल्याने लाभापासून वंचित असल्याचा आरोप केला.

विम्याचे पावणेआठ कोटी अप्राप्त
जिल्हाबँकेने कोटी ६५ लाख हजार ५६५ रुपये विमा कंपनीकडे भरलेले आहेत. याबाबत बँकेला विमाधारक शेतकऱ्यांसाठी कोटी ७४ लाख ४७ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे विमा कंपनीचे पत्र मिळाले आहे. मात्र, रक्कम मिळाली नसल्याचे देशमुखांनी सांगितले.

विमा कंपनीच्या प्रतिनिधीचा मोबाइल बंद
पिंप्राळा सर्कलच्या ८७९ थकित कर्जदार शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम जिल्हा बँकेने विमा कंपनीकडे भरलेली आहे. याबाबत आम्ही टाटा-एआयजी कंपनीचे प्रतिनिधी डॉ.जयंत चंदनखेडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मोबाइल बंद करून ठेवला आहे. जिल्हा बँक एजन्सी म्हणून काम करत नाही; विमा कंपनीची ही चूक आहे. त्यांनी विम्याची रक्कम दिल्यानंतर विमाधारक शेतकऱ्यांना त्वरित वाटप करण्यात येईल. जितेंद्र देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा बँक

२० शेतकऱ्यांवर गुन्हा
जिल्हा बँकेत मंगळवारी काही शेतकऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालकांच्या दालनातील खुर्च्या फेकून ताेडफाेड केली हाेती. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी वाजेच्या सुमारात जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा अाणल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. मुख्य व्यवस्थापक प्रकाश पाटील, सरव्यवस्थापक एम.टी.चाैधरी व्यवस्थापक प्रल्हाद सपकाळे यांनी संबंधित शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र, काही वेळानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा जितेंद्र देशमुख यांच्या दालनात खुर्च्या फेकून ताेडफाेड केली. तसेच पीक विम्याची फाइल घेऊन गेले. याप्रकरणी १५ ते २० शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

कोटी प्राप्त होऊनही वाटप नाही
यावेळी जिल्हा बँकेला प्राप्त झालेल्या विम्याच्या रकमेविषयी विचारणा केली असता, वेगळाच प्रकार समोर आला. आठ दिवसांपूर्वी दहा सर्कलच्या ४४३ विमाधारक शेतकऱ्यांसाठी कोटी १९ लाख हजार २५० रुपये प्राप्त झालेले आहेत. या रकमेपैकी जिल्हा बँकेने एक रुपयाही विमाधारक शेतकऱ्यांना दिलेला नसल्याची माहिती समोर आली.