आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा नको अब्रूची लूट, उगारू या वज्रमूठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘पुन्हा नको अब्रूची लूट, उगारू या कोटी जनांची वज्रमूठ.., अवंताच्या रक्षणाला सरसावले लक्ष-लक्ष बाहू, कोपर्डीच्या लेकीला आज श्रद्धांजली वाहू.., नकाे पुन्हा काेपर्डी नकाे पुन्हा अत्याचार अन्यायाविरुद्ध एकवटला हा काेटी मनांचा हुंकार...’, अादी भावनिक घाेषणांचे फलक हाती घेऊन साेमवारी काेपर्डी अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा महाक्रांती मूकमोर्चा काढण्यात आला. औरंगाबाद, बीडसह अन्य जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोर्चानंतर राज्यात जळगावचा मोर्चा हा प्रभावशाली राहिला. मोर्चात सव्वालाख मोर्चेकरी सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

कोपर्डी येथील अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे साेमवारी नूतन मराठा महाविद्यालयपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रचंड संख्येने मराठा महाक्रांती मूकमोर्चा काढण्यात आला. दुपारी वाजून ३५ मिनिटांनी “जिजाऊ वंदना’ होऊन नूतन मराठा महाविद्यालयापासून माेर्चाला सुरुवात झाली. माेर्चाच्या अग्रभागी विद्यार्थी, महिला, त्यानंतर हातात भगवे झेंडे काळ्या पेहरावात युवती, पदाधिकारी होते.

भावनिक फलके : ‘पुन्हा नको अब्रूची लूट, उगारू या कोटी जनांची वज्रमूठ..., निर्णय पक्का घेऊन मी सह्याद्री सारखी ताट अाहे, सांगा नराधमांना तुमची नारी शक्तीशी गाठ अाहे, अामची पाेरगी गेली जिवानिशी नराधमाला अाता तत्काळ फाशी...’ यासह विविध घोषणांचे भावनिक फलक मार्चामध्ये लक्ष वेधून घेत हाेते.

हे पदाधिकारी सहभागी
मोर्चातविविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यात खासदार ए.टी.पाटील, माजी खासदार वसंतराव मोरे, आमदार स्मिता वाघ, डॉ. सतीश पाटील, डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार दिलीप सोनवणे, कैलास पाटील, उदय वाघ, अॅड. संदीप पाटील, विनोद देशमुख, शैलजा निकम, विजया पाटील, नरेंद्र पाटील, डी.डी.बच्छाव, सतीश देवकर, डी.जी.पाटील, ज्ञानेश्वर आमले, राजीव देशमुख यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

दोन तास वाहतुकीची कोंडी
मोर्चालासुरुवात झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी वाढण्यास सुरुवात झाली. यात दुचाकी वाहनांकडून मिळेल तेथून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत होता. नूतन मराठा महाविद्यालय ते कोर्ट चौक, टॉवर ते शिवतीर्थ जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी वाहनधारकांनी आकाशवाणी, बहिणाबाई उद्यान, बळीरामपेठ, बेंडाळे चौक, सुभाष चौक या पर्यायी मार्गांनी इच्छित स्थळ गाठले.
बातम्या आणखी आहेत...