आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेधा पाटकर यांच्या अटकेचा तीव्र निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - उत्तर प्रदेशातील अलाहाबादजवळील करछाना औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी मेधा पाटकर जात होत्या. त्यांना अलाहाबाद येथे पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेचा पिंप्रीसेकम संघर्ष समितीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

करछाना येथील प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी विनाअट नोकरी द्या, ४५ वर्षांची अट लावून कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर घ्या, त्यांच्या वारसांनाही नोकरी द्या अशा मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सोमवारी देण्यात आले. प्रकल्पग्रस्त शेतकरी अधिकार अभियानचे कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी, रमाकांत चौधरी, विष्णू तायडे, दीपक काठे प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

दडपशाहीचा प्रकार
प्रकल्पग्रस्तांवरीलअन्यायाला वाचा फोडण्यासाठी लढणाऱ्या पाटकर यांना अटक करणे म्हणजे हा तर दडपशाहीचा प्रकार आहे. शासनाची कृती निषेधार्ह आहे, असे चंद्रकांत चौधरी यांनी यावेळी नमूद केले.