आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिण्याच्या पाण्यासाठी आता राज्यात आंदोलन :राजू शेट्टी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यास कारणीभूत ठरलेल्या धुळ्यातील मृत दंगलखोरांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा होते. मृत शेतक-या च्या कुटुंबीयांना मात्र दमडीचीही मदत मिळत नाही. ही परिस्थिती बदलवण्यासाठी आता उसाच्या आंदोलनाबरोबरच आता पाण्यासाठीही राज्यभर लढाई सुरू केली जाईल, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केली.

उन्मेश पाटील मित्रमंडळातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत होते. शेट्टी म्हणाले की, शेतक-या च्या समस्या सोडविण्यासाठी देशपातळीवर दबाव गट निर्माण होण्याची गरज आहे. जागतिक बाजारपेठेत मंदीची लाट असताना उद्योजकांच्या आत्महत्या कुठे ऐकिवात नाही, शेतक-या च्या आत्महत्या मात्र होत आहेत. कारण शेतकरी आपल्या मालाला स्वत: भाव ठरवू शकत नाही. तर उद्योजक आपल्या मालाचा भाव स्वत: ठरवतो.


कितीही आंदोलने झाली तरी शेतक-या चा घसा कोरडाच राहील. काहीतरी मागून घेण्यासाठी राज्यकर्त्यांकडून ओरबाडून घेण्याची वेळ आली असल्याचे शेट्टी म्हणाले.
शरद पवारांवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीचे राजकारण करून शेतक-या ची विभागणी करण्याचे ठरविले आहे, परंतु मुळात शेतकरी हीच जात महत्त्वाची असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.