आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकमंत्र्यांचे वाहन अडवले; पाेलिसांनी आंदोलनकर्त्यांना चाेप दिल्याने पळापळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनासमाेर अचानक उड्या घेऊन त्यांचे वाहन अडवण्याचा प्रसंग थेट जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी घडला. त्यामुळे बंदाेबस्तावरील पाेलिसांचीही भंबेरी उडाली. वाहन अडवणाऱ्या राष्ट्रीय दलित पँथरच्या कार्यकर्त्यांना गचांडी धरीत बाहेर काढताना संतप्त झालेल्या पाेलिसांनी चाेप दिला. त्यानंतर काही काळ वातावरण तणावपूर्ण हाेते. पालकमंत्र्यांचे वाहन अडवल्याच्या प्रसंगाचा पाेलिसांवर इतका परिणाम झाला की, त्यानंतर काेणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांपर्यंत पाेहाेचण्यास बंदी घातली गेली.

शहरात स्वातंत्र्यदिनाची लगबग सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मात्र संघटनांच्या अाक्रमक पवित्र्यामुळे संघर्षाचे वातावरण हाेते. पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तसेच त्यांना निवेदन देण्यासाठी संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गर्दी केली हाेती. त्यामुळे पाेलिसांवरील ताण वाढला हाेता. परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर जास्तीचा बंदाेबस्त लावण्यात अाला हाेता. ध्वजवंदनाचा कार्यक्रम वाजता हाेता. त्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांचे ८.४५ वाजता अागमन झाले. त्यांचे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारात शिरत असताना गेटमध्येच काही तरुणांचा घाेळका झाला. मात्र, पाेलिसांनी त्यांना बाजूला करून पालकमंत्र्यांच्या वाहनाला वाट माेकळी करून दिली. हे वाहन फर्लांगभर पुढे गेले असेल ताेच राष्ट्रीय दलित पँथरच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी अचानक पालकमंत्र्यांच्या वाहनासमाेर उड्या घेतल्या. त्यामुळे बंदाेबस्तावरील पाेलिसही चक्रावले. अचानक वाहनापुढे तरुण अाल्यामुळे वाहनाला ब्रेक लावावे लागले. {उर्वरित. पान

पँथरच्या या हाेत्या मागण्या
शिवसेनेचे साक्री तालुकाध्यक्ष विशाल देसले याच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. त्याला अटक करावी तसेच साक्रीच्या पाेलिस निरीक्षकांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी या वेळी राष्ट्रीय दलित पँथरचे कार्यकर्ते करीत हाेते.

एकच धावपळ उडाली
पालकमंत्र्यांचेवाहन अडवल्यानंतर एकच धावपळ उडाली. त्यामुळे ध्वजवंदनासाठी अालेल्या नागरिकांमध्येही चुळबुळ सुरू झाली. पाेलिसांच्या मारहाणीमुळे तणाव वाढल्याने पाेलिसही नेमके काय करावे, या स्थितीत असल्याचे दिसून अाले. वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांपैकी पाेलिस उपअधीक्षक जाधव घटनास्थळी हाेते. त्यांनीच त्यानंतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांकडे जायला मज्जाव केला.

कार्यकर्त्यांना बाजूला केले
^पालकमंत्र्यांनाध्वजवंदनानंतरनिवेदन देता अाले असते. शांततेत सगळे करता अाले असते. मात्र पालकमंत्र्यांच्या वाहनासमाेर उड्या घेऊन वाहन अडविणे स्वातंत्र्यदिनी याेग्य नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना पकडून बाजूला केले. मारहाणीचा काही प्रश्न उद्भवत नाही. -हिंमतजाधव, डीवायएसपी

मारहाणीची चाैकशी करणार
मंत्रीअसलाेतरी जेव्हाही जिल्हाधिकारी कार्यालयात जाताे तेव्हा वाहनाच्या खाली उतरून निवेदन स्वीकारताे. मात्र, अांदाेलन करणाऱ्यांनी किमान स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व तरी जपायला हवे. माझ्यासमाेर मारहाण झाली नाही. मात्र, नंतर जर पाेलिसांनी मारहाण केली असेल तर त्याची चाैकशी केली जाईल. अशा मारहाणीचा निषेधच करताे. -दादाभुसे, पालकमंत्री
पालकमंत्र्यांची अचानक गाडी अडवणाऱ्यांना गचांडी धरून बाहेर काढताना पोलिस अिधकारी.

डीवायएसपींनी केली मारहाण
गंभीर गुन्ह्यातीलअाराेपी माेकाट फिरत अाहेत. त्यांना प्रशासनाची साथ अाहे. गरिबांना न्याय मिळत नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेलाे हाेताे. मात्र, पाेलिसांनी निवेदनही देण्यास मज्जाव केला. त्यामुळे अांदाेलनाची भूमिका घेतली. मात्र, पाेलिस उपअधीक्षक हिंमत जाधव यांनीच बेदम मारहाण करायला सुरुवात केली. -सिद्धार्थवाघ, पदाधिकारी राष्ट्रीय दलित पंॅथर
पुढील स्लाइड्सवर पाहा, फटोज...
बातम्या आणखी आहेत...