आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टीधारकांची शक्कल; रेल्वे प्रशासन जेरीस, आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंदोलन करत्या महिला... - Divya Marathi
आंदोलन करत्या महिला...
जळगाव- सुरतरेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी दूध फेडरेशनसमाेरील झाेपडपट्टी काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईला झाेपडपट्टीधारकांनी साेमवारी रात्रीपासून ठिय्या अांदाेलन सुरू केले. मंगळवारीदेखील ठिय्या अांदाेलन अाणि रेल राेकाे केले. झाेपडपट्टीधारकांनी अनेक शक्कल लढवून रेल्वे प्रशासनास अक्षरश: जेरीस अाणले हाेते.

साेमवारी रात्री प्रारंभी रेल्वेस्थानकाबाहेर ठिय्या मांडला. त्यानंतर रात्री १.१५ वाजता अांदाेलनकर्ते दाेन गटात विभागून रेल्वेस्थानकावरील प्लाॅटफाॅर्म क्रमांक दाेन तीन वर गेलेत. तेथे ‘झाेपडपट्टी नही हटेगी’चे बॅनर्स लावण्यात अाले हाेते. रात्री प्रत्येक येणाऱ्या रेल्वे गाडीला अडवण्याचे नियाेजन असल्याचे अांदाेलनकर्ते बाेलून दाखवत हाेते. मात्र, मंगळवारी दुपारी १२.४० पर्यंत ठिय्या अांदाेलन सुरू हाेते. दुपारी १२.३५ ला भागलपूर-सुरत छपरा एक्स्प्रेस अाली. तिला अांदाेलनकर्त्यांनी अडवले.

२५मिनिटे घाेषणाबाजी
प्लाॅटफाॅर्मवर छपरा एक्स्प्रेसला राेखण्यासाठी महिला माेठ्या संख्येने रुळावर बसल्या. जगन साेनवणे, राजू डाेंगरदिवे, राकेश बग्गन, मुकेश बडगे यांच्यासह कार्यकर्ते रेल्वे इंजिनवर चढून घाेषणा देऊ लागले. यात ‘काेण म्हणताे देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. नही हटेगी झाेपडपट्टी नही हटेगी, रात्रभर झाेपा काढणाऱ्या डीअारएमला निलंबित करा. डीअारएम मुर्दाबाद,’ यासारख्या घाेषणांनी रेल्वेस्थानक दणाणून साेडले.

दुपारी १२.५५ ला शहर ठाण्याचे पाेलिसांनी रेल्वे इंजिनवर चढलेल्या कार्यकर्त्यांना खाली उतरवले अांदाेलन मागे घेण्यास सांगितले. त्याला काही वेळ विराेध झाला. त्यानंतर जगन साेनवणे यांना खाली उतरवत प्लाॅटफाॅर्मवर अाणले. तेथे पाेलिसांतर्फे साेनवणे यांना पाण्याची बाटली देण्यात अाली. या वेळी अप्पर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्यांना अटक केल्याचे सांगितले. त्या वेळी साेनवणे यांच्या भाेवती महिला अांदाेलनकर्त्यांनी गराडा करत विराेध दर्शवण्याचा प्रयत्न केला. या वेळी शहर पाेलिस ठाण्याच्या महिला पाेलिसांना पुढे करत महिला अांदाेलकांना दूर केले. साेनवणे यांना पाेलिसांनी ताब्यात घेत प्लाॅटफाॅर्म तीनवरील रेल्वे पाेलिस बलाच्या केबीनमध्ये नेण्यात अाले. तेथे अांदाेलनकर्त्यांवर गुन्हा नाेंदवण्यात अाला. त्यानंतर जगन साेनवणे यांनी सहा प्रमुख महिला अांदाेलनकर्त्यांना बाेलावून इतर महिलांना घरी नेण्याबाबत सूचना दिल्या.

झोपडपट्टीवासीयांचा विरोध
रेल्वेस्थानकावर अांदोलन सुरू असताना दूध फेडरेशन परिसरातील दांडेकरनगरलगत असलेली झाेपडपट्टी हटवण्यास मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे कर्मचारी अाणि पाेलिसांचा फाैजफाटा अाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर दुपारी वाजेच्या सुमारास स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत मिळाल्याने काही िदवस का हाेईना तेथील नागरिकांना िदलासा मिळाला.जळगाव-सुरतदरम्यान पश्चिम रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम सुरू अाहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारी २०१४मध्ये दूध फेडरेशनजवळील रेल्वेगेटच्या पश्चिम बाजूच्या १२४ झाेपड्यांचे अतिक्रमण काढले हाेते. त्यामुळे जानेवारी महिन्यात त्या िठकाणापर्यंत रेल्वेलाइनचे काम पूर्ण झाले. त्यानंतर रेल्वेगेटच्या पूर्वेकडील दांडेकरनगरला लागून असलेल्या झाेपडपट्टीवासीयांना नाेटिसा बजावण्यात अाल्या. मात्र, त्यांनी अतिक्रमण स्वत:हून काढल्याने रेल्वे प्रशासनाने झाेपड्यांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.

पोलिसांचा फाैजफाटा
अतिक्रमणकाढण्यासाठी अधिकारी, अभियंते अाणि १५२ गँगमन यांचा समावेश हाेता. अारपीएफचे निरीक्षक, उपनिरीक्षक, ११७ कर्मचारी हाेते. िजल्हा पाेलिस दलाचे अप्पर पाेलिस अधीक्षक, पाेलिस उपअधीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक अाणि उपनिरीक्षक, १०७ कर्मचारी तैनात हाेते.

सुरत रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी दूध फेडरेशनसमाेरील दांंडेकरनगर येथील झाेपडपट्टी हटवतांना रेल्वेकर्मचारी. अितक्रमण हटवत असताना झोपडपट्टीतील लहान मुलांसह महिलांना रडू कोसळले.

हुडकोत जागा देणार
अापल्याअांदाेलन यशस्वी झाले असून झाेपडपट्ट्या स्वत:हून हटवण्यास १५ दिवसांची मुदत देण्यास वाढ देण्यात आली आहे. हुडकाेत जागा देण्याबाबतचे अाश्वासन रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. जगनसोनवणे,पीपल्स रिपब्लिकनपार्टी

स्वत: झोपड्या हटवणार
झाेपडपट्टीधारक१५ दिवसांच्या अात स्वत:हून झाेपड्या हटवणार अाहेत. डीअारएम यांच्याकडे पर्यायी सुविधेसाठी १५ दिवसांची मुदत मागितली. त्यांनी ती मान्य केली असून, १५ िदवसांत नागरिक झाेपड्या हटवणार अाहेत. राजूपटेल, नगरसेवक,प्रभाग क्र. (ब)
अतिक्रमण काढण्यास १५ दिवसांची मुदत
^पश्चिमरेल्वेच्यानवीन लाइन टाकण्यासाठी झाेपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी झाेपडीधारकांना १५ दिवसांची मुदत दिली अाहे. मंगळवारी केवळ बंदाेबस्त लावण्यात अाला हाेता. काही झाेपडीधारकांनी स्वत: झाेपड्या काढून घेतल्या. - चंद्रमाेहन मिश्र, अायुक्त,रेल्वे सुरक्षा दल

रहिवाशांच्या विविध क्लुप्त्या
अतिक्रमणकाढू नये यासाठी रहिवाशांनी विविध क्लुप्त्या लढवल्या. त्यात काही जण घराला कुलूप लावून बाजूला जाऊन उभे राहिले, तर एका अाजीबाईने स्वत:च्याच घराला अाग लावून घेतली. मात्र, शहर पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश सपकाळे यांनी प्रसंगावधान राखून अाग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तसेच अनेकांनी घरातून सामानच बाहेर काढले नाही घरात पाळीव प्राणी बांधून ठेवले. याशिवाय अनेक जणांनी पर्यायी जागा मिळेपर्यंत अतिक्रमण काढण्यास मज्जाव केला.
भुसावळात ११ जणांवर गुन्हे दाखल
भुसावळ जळगावरेल्वेस्थानकावर रेल राेकाे अांदाेलन करणाऱ्या पीअारपीचे जिल्हाध्यक्ष जगन साेनवणे यांच्यासह ११ जणांवर रेल्वे सुरक्षा बलाने गुन्हे दाखल केले. या सर्व अांदाेलकांना अटक करून भुसावळ रेल्वे न्यायालयात मंगळवारी संध्याकाळी हजर करण्यात अाले. न्यायाधीश राहुल थाेरात यांनी सर्व ११ जणांना न्यायालयीन काेठडी सुनावून जामिनावर साेडले.
जिल्हाध्यक्ष जगन साेनवणेंच्या नेतृत्वाखाली ताप्ती गंगा एक्स्प्रेस राेखली. नियाेजित वेळेपेक्षा ही गाडी २३ मिनिटे जास्त खाेळंबून ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी पीअारपीचे जिल्हाध्यक्ष जगन साेनवणे, राजू डाेंगरदिवे, राकेश बग्गन, मुकेश जाधव, अनिल बडगे, दीपक जाेहरे, रमेश भाेई, सूरज अहिरे, राजू रुपवते, परशुराम सपकाळे, गाैतम निकम यांच्यावर प्रत्येकी वेगळा गुन्हा दाखल करण्यात अाला. सर्व ११ जणांना भुसावळ येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात अाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेचे PHOTO'S