आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा बंद; चालकांची ‘दबंगगिरी’, अांदाेलकांचा माेर्चा; प्रवाशांचे प्रचंड हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर शहर वाहतूक शाखा आरटीओच्या पथकाने गुरुवारी कार्यवाही केली. यात रोख दंड केल्याचा राग असल्यामुळे शिव वाहतूक सेना, रेल्वेस्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा युनियन सुभाषचंद्र बोस रिक्षा संघटनांनी शुक्रवारी बंद पाळला. या बंदमुळे शहरात सर्वच रिक्षांची वाहतूक ठप्प करण्यासाठी शिव कॉलनी ते बांभोरीदरम्यान सुरू असलेल्या रिक्षांना जबरदस्तीने बंद करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पोलिस बंदोबस्त पाठवल्यानंतर या मार्गावरील रिक्षा वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, बंदमध्ये सहभागी असलेल्या संघटनांनी विनम्रतेनेच बंद पुकारला हाेता, असे शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष नीरज जैस्वानी यांनी सांगितले.

सकाळपासूनच संघटनांनी बंदचे आवाहन केले. यात केवळ तीन संघटनांनीच बंद पुकारल्यामुळे इतर संघटनांच्या रिक्षा सुरूच होत्या. त्यामुळे काही रिक्षाचालकांनी शिव कॉलनी, गुजराल पेट्रोलपंप, खोटेनगर बांभोरी या स्टॉपवर थांबून प्रवाशांना घेऊन वाहतूक करणाऱ्या रिक्षांना अडवले त्यातील प्रवाशांना खाली उतरवत रिक्षा पुढे जाऊ दिल्या नाहीत. या दबंगगिरीमुळे या मार्गावर जाणाऱ्या शेकडो विद्यार्थी, चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. या मार्गावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय जैन इरिगेशन कंपनी आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर रिक्षा वाहतूक सुरू असते. नेमक्या याच वेळी प्रवासी रिक्षाचालकांसोबत दबंगगिरी झाल्यामुळे वातावरण तापले होते. काही गैरप्रकार होऊ नये म्हणून अनेक प्रवासी रिक्षातून उतरून गेले. तासभर हा प्रकार सुरू होता. त्यानंतर ही माहिती शहरात पसरली. पोलिसांनी या मार्गावर बंदोबस्त वाढवल्यानंतर दुपारी ११ वाजेपासून हा मार्ग सुरळीत सुरू झाला.

मोर्चास परवानगी नाही
माेर्चाची परवानगी घेतलेली नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना वेळ देता वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे पाठवले. येथे काही वेळ चर्चा केल्यानंतर ज्या रिक्षांची कागदपत्रे कायदेशीर होती, त्यांच्याकडून योग्य दंड घेऊन सोडण्यात आले. तर उर्वरित रिक्षा पोलिसांकडेच जप्त आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

या कारणांमुळे बंद
रिक्षा चालकांना गणवेश शिवणे, परवाना नूतनीकरण करणे, कागदपत्र नसणे या कारणांमुळे गुरुवारी शहर वाहतूक शाखा आरटीओने संयुक्तरीत्या कारवाई केली. यात आरटीओने दोषी आढळून अालेल्या रिक्षाचालकांवर एक हजार रुपयांपेक्षा जास्तचा दंड केला. तसेच १००पेक्षा जास्त रिक्षा जप्त केल्या. यामुळे तीन संघटनांनी शुक्रवारी रेल्वेस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. गणवेशासाठी एक महिना वेळ द्या, वाहतूक शाखेनेच दंड करावा, आरटीओचा दंड महागात पडतो. पुरेशा प्रमाणात कमाई नसल्याने दंड भरणे परवडत नाही, म्हणून दंडाची रक्कम कमी करावी, अशा मागण्या मोर्चातून करण्यात आल्या. शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष नीरज जैस्वानी, रिक्षा युनियनचे अध्यक्ष शांताराम अहिरे, योगेश बारी, इस्मार्इल शाह गुलाब शाह, जितू ठाकूर, अनिल नन्नवरे, गणेश नाचोने यांचा या वेळी सहभाग होता.
आम्ही कुणालाही जबरदस्ती केली नाही
रिक्षा बंद ठेवण्यासाठी आम्ही हात जोडून विनंती केली. महामार्गावर जबरदस्तीने रिक्षा थांबवण्याच्या प्रकारात आमचा संबंध नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पोलिस निरीक्षक देशमुख यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर बंदचे आंदोलन दुपारी मागे घेण्यात आले. नीरजजैस्वानी, जिल्हाध्यक्ष, शिव वाहतूक संघटना

बेशिस्त चालकांवर कारवाई सुरूच राहणार
बेशिस्तरिक्षाचालकांवरकारवाई सुरूच राहणार आहे. मेमो दिलेल्या रिक्षांकडून दंड वसूल करण्यात येत आहेत. त्यात सूट दिली जाणार नाही.| अनिलदेशमुख, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
बातम्या आणखी आहेत...