आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पुढारी’ व्यापाऱ्यांमुळे गाळे करारात अडथळा, गाळेधारकांना रस्त्यावर येण्याची आली वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेने व्यापारी हित लक्षात घेऊन ९९ वर्षे त्यानंतरही वेळोवेळी चांगले गाळे कराराचे ठराव करून दिले होते. मात्र, या चांगल्या प्रस्तावांना नाकारत पुढारपण करणाऱ्या काही व्यापाऱ्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे सर्वच गणित चुकले आहे. अजून कमी मोबदला देऊन गाळे करार पदरी पाडून घेण्याच्या लालसेपाेटी रस्त्यावर येण्याची वेळ गाळेधारकांवर आली आहे.
महापालिकेचे जळगाव शहरात एकूण २९ व्यापारी संकुलांमध्ये हजार ५१७ गाळे आहेत. यापैकी १८ व्यापारी संकुलांमधील हजार १७५ गाळ्यांची मुदत संपली आहे. मुदत संपलेल्या फुले सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांसाठी पालिकेने ९९ वर्षांचा करार मंजूर केला होता. व्यापारी हिताचा हा प्रस्ताव असताना व्यापाऱ्यांमधील पुढारपण करणाऱ्यांनी याला विरोध करत राज्य शासनाकडे विखंडित करण्यासाठी प्रयत्न केले. यानंतरही वेळोवेळी केलेल्या चांगल्या ठरावांना व्यापाऱ्यांचे पुढारपण करणाऱ्यांनी विरोध केला. समन्वयातून मार्ग काढण्यासाठी सभागृहाने बैठका घेऊनही त्याला जुमानता न्यायालयीन लढाईचे मार्ग दाखवणाऱ्यांमुळे मुदत संपलेल्या गाळेधारकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली असून नव्याने चर्चा करुन ताेडगा काढण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शवली आहे.
उच्च न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. मुदत संपलेल्या गाळेधारकांना चार आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यांना पुन्हा न्यायालयात जायचे असल्यास जाऊ शकतात. मात्र, न्यायालयाबाहेर ताेडगा काढण्याची तयारी असल्यास कायद्याच्या चाैकटीत राहून चर्चेतून ताेडगा निघू शकतो.
-अॅड. केतन ढाके
काय म्हणतात, कायदे तज्ज्ञ?
व्यापाऱ्यांची ऐन पावसाळ्यात पंचाईत
उच्चन्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपिलात जाण्यासाठी व्यापाऱ्यांना चार आठवड्यांची मुदत मिळाली आहे. मात्र, न्यायालयीन खेट्या मारून तीन वर्षे वाया गेली आहेत. अपिलात गेल्यावरही या निर्णयात फारसा बदल होणार नाही, ही जाणीव व्यापाऱ्यांना आहे. त्यामुळे चार आठवड्यांनंतर पावसाळ्यात रस्त्यावर येण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढण्याची मानसिकता व्यापाऱ्यांनी ठेवली आहे.
दुकानदारी मांडलेल्यांमुळे नुकसान
पालिकेनेव्यापाऱ्यांसाठी वेळाेवेळी चांगले ठराव करून दिले हाेते. मात्र, सर्वच गाळेधारकांना कायद्याचे ज्ञान नसल्याने विशिष्ट गाळेधारकांनी पुढारपण करत आपली पाेळी भाजून घेतली. पालिकेच्या चांगल्या ठरावांना विराेध करून सर्व गाळेधारकांचे नुकसान केले.
-भरत समदडिया, व्यापारी
बसून मार्ग काढणे हाच पर्याय
मनपाने९९ वर्षांचा चांगला ठराव करून दिला हाेता. मात्र, गाळेधारकांची दिशाभूल करत काहींनी चुकीच्या लाेकांचे मार्गदर्शन घेतले. त्यामुळे गाळे साेडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांसाेबत बसून मार्ग काढणे हाच पर्याय व्यापाऱ्यांसमोर आहे.
-राजकुमार अडवाणी, माजीनगरसेवक, व्यापारी
बातम्या आणखी आहेत...