आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेशल मीडियामुळे जाेडले जाताहेत दुरावलेले अन‌् समविचारी लाेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इंटरनेटमुळेघर बसल्या जगाची सफर हाेत अाहे. एवढेच नव्हे तर साेशल मीिडयामुळे दुरावलेली माणसे सहज जाेडली जात अाहे. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केल्यास ते वरदान ठरत असल्याचा प्रत्यय सध्या येत आहे. जळगाव शहरातदेखील साेशल मीडिया (फेसबुक, व्हाॅट्सअॅप, हाइक,) वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली अाहे. साेशल मीडियाच्या माध्यमामुळे कुठे सुखदकिंवा दु:खद घटना घडली तर काही मिनिटांतच ती अापल्या जवळच्या व्यक्तीपर्यंत पाेहोचवली जाते.विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर राजकारण्यांनी याच्या माध्यमातून जाेरदार प्रचार केला हाेता. अाता सध्या ते राजकीय ग्रुप थंडावले असले तरी काॅलेजियन्स, शेतकरी अाणि काैटंुबिक ग्रुप तयार करण्याचा ट्रेंड वाढला अाहे.
डॉक्टर, वकील अन् बिल्डरही सहभागी
नेहमीरुग्णांच्या मागे फिरणारे डाॅक्टर, वकील अाणि बिल्डर लाॅबी वेळात वेळ काढून व्हाॅट्सअॅपवर अॅक्टिव्ह असल्याचाविश्वास बसणार नाही. मात्र, या मंडळींच्या ग्रुपवरही व्हेज, नाॅन-व्हेज जाेक्स, त्यांच्या फिल्डशी संबंधित माहितीचे अादान-प्रदान हाेते. रात्री उशिरापर्यंत ही मंडळी ग्रुपवर अॅक्टिव्ह असते.
नव्या प्रयोगातूनअाधुनिक शेतीचे धडे

जळगाविजल्ह्यातील शेतकरी िमत्रांनी शेती अाणि शेतीशी संबंधित असलेल्यांचे काही ग्रुप व्हॉट्सअॅपवर तयार केले अाहेत. या ग्रुपवर नावीन्यपूर्ण शेती, सेंद्रिय शेती, शेती करताना अालेले अनुभव अशा स्वरुपाची माहिती अद्ययावत करण्यात येते. यासह एखाद्या शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी या ग्रुपवर शेअर करून त्यातून मार्गदेखील काढता येताे. त्यामुळे शेतकऱ्याला घरबसल्या अडचणींवर मात करता येत अाहे. एवढेच नव्हे तर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याला हायटेक शेतीचे धडेहीमिळत अाहे.
राजकीय पक्षांचे ग्रुप थंडावले
निवडणूककाळात भाऊ, दादा, मामा, अण्णा, अप्पा यांच्या प्रचारासाठी खास तयार झालेले राजकीय पक्षांचे ग्रुप थंडावले अाहेत. नैमित्तीक ग्रुपचे कारण उपयाेगिता संपल्याने यावर सक्रिय असलेली मंडळी शांत झाली अाहे. त्यामुळे इथे प्रचार, तिथे सभा अशा पाेस्ट कमी झाल्याने माेबाइल मेमरीचा भारही काही प्रमाणात कमी झाला.
काॅलेजियन्स ग्रुपवर धमाल : १०-१५ वर्षांपूर्वी एकाच महाविद्यालयातशिकणारी मंडळी व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांशी जाेडली जात अाहेत. तेव्हाचे काॅलेजियन्स अाताचे विविध व्यावसायिककिंवा नाेकरदार अाहेत. एकमेकांशी संपर्कातून मैत्रीची नाळ घट्ट होत अाहे. हल्लीचे महाविद्यालयीन युवक, युवतींकडेही अँड्रॉइड माेबाइल असल्याने रात्री उशिरापर्यंत त्यांची धमाल सुरू असते.
शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष : शिक्षक,पाेलिस, महसूल, पालिका अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांकडूनविशिष्ट ग्रुप तयार करण्यात अाले अाहेत. अापापल्या विभागातील अद्ययावत माहिती, शासननिर्णय यासह महत्त्वाचेनिर्णय या ग्रुपच्या माध्यमांतून शेअर करण्यात येतात. कधीकधी याविभागांशी संबंधित इतरजिल्‍ह्यातील माहितीही ग्रुपवर शेअर करण्यात येते.
सण उत्सवांसह सुख-दु:खाचे काैटुंबिक शेअरिंग
अात्या,मामा, मावशी, काका, काकू अशा काैटुंबिक नात्यांची जपणूक करत नवीन पिढीकडून काैटुंबिक ग्रुप तयार करण्याची क्रेझ अाहे. या ग्रुपच्या माध्यमांतून कुटुंबात (खटल्यात) जन्मणारी मुले, मुली, अपघात, िनधन वार्ता, लग्न समारंभ यासह इतर कार्यक्रमांची माहिती अद्ययावत करण्यात येते.
कुठे काय झालय? तत्काळअपडेट
प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधी, छायाचित्रकार अाणि चालू घडामाेडींशी संबंधित समविचारी लाेकांनी मीडियाशी संबंधित ग्रुप तयार केले अाहेत.दिवसभरात शहर अाणि जिल्ह्यात घडणाऱ्या प्रमुख राजकीय, सामाजिक, गुन्हेगारीविषयक माहिती अाणि इतर घडामाेडी अद्ययावत करण्यात येतात.