आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या मुलांना फीमाफी, बियाणे, अनुदान, खडसे यांनी दिली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - दुष्काळामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या मुलांचे पहिली ते बारावीपर्यंतचे शैक्षणिक शुल्क सरसकट माफ करण्यात येणार आहे. शिवाय २.५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेचे ५० टक्के शुल्क सरकार देणार अाहे. दुबार पेरणीची वेळही टळली असली तरी पाऊस आल्यास शेतकऱ्यांना बियाणे व १५०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला अाहे, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, दुबार पेरणीची वेळ टळून गेली आहे. त्यामुळे अाता पाऊस आल्यास शेतकऱ्यांनी चारा पिके घ्यावीत. त्यासाठी बियाणे, अनुदान दिले जाईल. शिवाय शेतकऱ्यांचा चारा सरकार विकत घेण्याची हमी देईल. तुटवडा असेल तेथे हा चारा पाठवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कर्जमाफी नाही
शेतकऱ्यांच्या कर्जात कुठलीही माफी दिली जाणार नाही. त्यासाठी कर्जाच्या पुनर्गठनाचा पर्याय ठेवण्यात अाला अाहे. त्यातून शेतकऱ्यांना मागील कर्जाची थकबाकी असली तरी कर्ज मिळायला अडचण येणार नाही.
१५०० रुपयांचे अनुदान
चांगला पाऊस असल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्यासाठी बियाणे सरकारकडून दिले जाईल. अन्यथा जेमतेम पावसावर येणाऱ्या चारा पिकांसाठीही ते दिले जाईल. याशिवाय त्यासाेबतच शेतकऱ्यांना १५०० रुपयांचे अनुदान दिले जाईल. कर्जस्वरूपात ही रक्कम नसेल. पिकाच्या रक्षणासाठी ती दिली जाणार आहे. हा चारा शासनच खरेदी करेल व गरज असेल तेथे तो पाठवला जाईल.
टँकरचे अधिकार तहसीलदारांकडे
पाण्याची टंचाई अागामी काळात निर्माण हाेणार अाहे. त्यासाठी टँकर लावण्याचे व पाण्यासाठी उपाययाेजना करण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले अाहेत. गटविकास अधिकारी त्यांना सहकार्य करतील. गावांची चाचपणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले अाहेत.
जिल्हे, तालुका निर्मिती नाहीच जिल्हे किंवा तालुका निर्मितीची चर्चा झालेली नाही. सरकारपुढे तसा प्रस्तावही नाही. यापूर्वी अशा स्वरूपाच्या काही मागण्या झाल्या. त्यानुसार चाचपणी
करण्यात अाली. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे आला आहे. त्यापेक्षा जास्त माहिती सरकारकडे नाही.