आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aid Of Jalgoan Grandmother's Blog Come Into Book

जळगावच्या पुढाकाराने अाजीबाईंच्या ब्लाॅगचे पुस्तक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘अाजीबाई’ म्हटले की, अापल्याला नेहमी साेशल अाणि ई-मीडियाशी जुळलेल्या तरुण पिढीला बाेलणारी, त्यांच्या माेबाइल, संगणकाला डब्बा म्हणणारी व्यक्ती नजरेसमाेर येते. पण काेल्हापूरच्या अाजीबाईंचा ब्लाॅग अाणि फेसबुकवर अकाउंट अाहे. अाता या ब्लाॅगचे जळगावातील दाेन जणांच्या पुढाकारामुळे पुस्तक तयार हाेत असून, त्याचे महिन्याभरात अमेरिकेत प्रकाशन हाेणार अाहे.

काेल्हापूरच्या वसुधा चिवटे, वय वर्षे ७३ या अाजीबाई ब्लाॅग चालवतात. संगणक, ई-मेल, वेब काॅमवर चॅटिंग एखाद्या तरुणासारखेकरतात. त्यांचा https://vasudhalaya.wordpress.com/ हा ब्लाॅगचे अाता पुस्तक तयार हाेत अाहे. जळगावात त्याची छपाई हाेत असून याचे प्रकाशन अमेरिकेत हाेणार अाहे. जळगावातील किशाेर कुळकर्णी कृपा प्रकाशनच्या रेवती विभाकर कुरंभट्टी यांनी यासाठी पुढकार घेतला अाहे. ब्लाॅगला चार वर्षात लाख, ४५ हजार, ८९८ लाेकांनी भेट दिली अाहे.

तंत्रज्ञानाशी समरस
७३व्यावर्षी वसुधा अाजी जर तंत्रज्ञानाशी पूर्णपणे समरस झालेल्या अाहेत. ही खूप माेठी गाेष्ट अाहे. अापण अाजही कंटाळा करताे, पण काेणतेही ज्ञान अवगत करणे, कधीही वाया जात नाही. त्यांचीही इच्छा हाेती की पुस्तक छापले जावे, मी त्यास हातभार लावला, असे किशाेर कुळकर्णी म्हणाले.

मुलांनी शिकवले संगणक
वसुधाचिवटे या १९६२ साली दहावी उत्तीर्ण झाल्या. त्यांनतर १९६६ साली त्यांचे लग्न झाले. पती शिवाजी विद्यापीठात कार्यरत हाेते. मुलगा पुष्कर अमेरिकेतील अटलांटा येथे साॅफ्टवेअर कंपनीत अाहे. ताे अमेरिकेत गेल्यानंतर त्याने संवादासाठी २०१०साली कुटुंबीयांना संगणक घेऊन दिला. मग वेबकाॅमद्वारे काही बेसिक ज्ञान पुष्कर अाणि दुसरा मुलगा प्रणव यांनी वसुधा यांना दिले. त्यानंतर हळूहळू त्यांना गाेडी निर्माण झाली अन् त्यांनी स्वत:च पुढाकार घेत इंग्रजी टायपिंग सुरु केले. नंतर मुलांना ई-मेल करणे, गुगल ट्रान्सलेटरचा उपयाेग करणे, मराठी टायपिंगही मुलांनी शिकवली, त्या ई-मेलचे अाता ब्लाॅगमध्ये रुपांतर झाले अाहे.

वसुधा अाजी प्रेरणास्थान ठरेल
वसुधायांनी ७०व्या वर्षी तंत्रज्ञानात पूर्ण पारंगत हाेणे, ही बाब प्रेरणादायी अाहे. किशाेर कुळकर्णी यांना हे समजल्यावर त्यांनी प्रकाशनाबाबत विचारले. मी हाेकार दिला. कारण ई-साक्षरतेसाठी वसुधाअाजी प्रेरणास्थान ठरेल. -विभाकर कुरंभट्टी,कृपा प्रकाशन

सर्वसामान्यांच्या जीवनातील गाेष्टी
ब्लाॅगमध्येदेवांचे महत्त्व, सणावारांची माहिती, त्यांनी केलेल्या भाजीची रेसिपी अाणि फाेटाे, तुळशी वृंदावन, रांगाेळीचे फाेटाे, संस्कृतीची माहिती, मराठी भाषेची माहिती साेप्या भाषेत लिहिल्या अाहेत. राेज एक ब्लाॅग त्या पाेस्ट करतात. वाचकवर्गाचा प्रतिसाद पाहून त्यांना उत्साह येताे, ते अाता अायुष्याचे भाग झाल्याचे वसुधा सांगतात.