आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अायएमए’ने आता डाॅक्टरांच्या ‘पेग’वर घातल्या मर्यादा,अनेकांनी केले सूचनांचे स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव :  इंडियन मेडिकल असाेसिएशनने राष्ट्रीय पातळीवरून डाॅक्टरांच्या ‘पेग’मर्यादेवर घातलेल्या निर्बंधाचा विषय सध्या चर्चेचा ठरत अाहे. समाजातील प्रतिष्ठित राेल माॅडेल ठरणाऱ्या डाॅक्टरांनी सार्वजनिक ठिकाणी तसेच डाॅक्टर नसलेल्या व्यक्तींसाेबत मद्यप्राशन करू नये, अशी सूचना देण्यात अाली अाहेत. तसेच पुरुष महिला डाॅक्टरांनी किती ‘पेग’ घ्यावा याबाबतही मार्गदर्शक सूचना जारी केल्या अाहेत. दरम्यान, याबाबत डाॅक्टरांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह असले तरी, नैतिक बंधन पाळण्याचे अावाहन केले जात अाहे. 
 
समाजात डाॅक्टरांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकाेन असताे. लहान मुलांना माेठा झाल्यावर काय हाेशील? असे विचारल्यास ताे ‘डाॅक्टर हाेईल’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करताे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांच्या मनात डाॅक्टरांबद्दल वेगळी भावना अादर असताे. अशा परिस्थितीत डाॅक्टरांनी अापली प्रतिष्ठा अाणखी उंचावण्यासाठी स्वत:ला काही अाचारसंहिता लावून घेतलेली असते. सकाळपासून रात्री केव्हाही रुग्णांच्या सेवेस तत्पर असलेल्या डाॅक्टरांचे व्यक्तिमत्त्व अाणखी उंचावण्यासाठी इंडियन मेडिकल असाेसिएशनने डाॅक्टरांसाठी नुकत्याच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या अाहेत. राष्ट्रीय पातळीवरून अालेल्या या सूचनांमध्ये डाॅक्टरांच्या मद्यप्राशनासंदर्भातही काही सल्ले देण्यात अाले अाहेत. 
 
यात डाॅक्टरांनी कुणासाेबत, कधी तसेच किती पेग घ्यावेत? याचा अंतर्भाव अाहे. डाॅक्टरांनी मद्यप्राशन करण्यास डाॅक्टर नसलेल्या व्यक्तींसाेबत जाऊ नये, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन टाळावे, पुरुषांनी १८ मिलि, तर महिला डाॅक्टरांनी मिलि मद्यप्राशन करावे. ही मर्यादा अाराेग्यासाठी लाभदायी असल्याचे सूचनांमध्ये म्हटले अाहे. दरम्यान, यासंदर्भात डाॅक्टरांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह असून, चांगल्या सूचनांचे पालन करण्याच्या प्रतिक्रिया व्यक्त हाेत अाहेत. 
 
कामावर असताना काळजी घ्या 
डाॅक्टर हे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रुग्णांमध्ये असतात. अशा परिस्थितीत रुग्णांच्या अाराेग्याच्या दृष्टीने कामावर असताना काेणी मद्यप्राशन करत नाही. तशी काळजी घेतली पाहिजे. अायएमएच्या सूचना बंधनकारक नसल्या तरी त्या पाळाव्या. डाॅक्टर सुटीवर असल्यास या नियमांचे बंधन राहत नाही. डाॅ.विलास भाेळे, उपाध्यक्ष, अायएमए 
 
प्रत्येकाने अाचारसंहितेचे पालन करावे 
लहान शहरांमध्ये डाॅक्टर रुग्ण यांचे भावनिक संबंध जुळलेले असतात. अनेक लाेक डाॅक्टरांना राेल माॅडेल मानतात. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय हा धर्म असल्याने लाेकांमधील अादर कायम राहील यासाठी प्रयत्नशील असायला हवे. काेणत्याही क्षणी रुग्ण उपचारासाठी येण्याची शक्यता असल्याने काळजी घेतली पाहिजे. अायएमएच्या सूचना पाळण्याचे नैतिक बंधन अाहे. - डाॅ.अनिल पाटील, राज्य उपाध्यक्ष, अायएमए 
 
राष्ट्रीय स्तरावरून सूचना 
समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून डाॅक्टरांकडे पाहिले जाते. ‘अाजारातून बरे करणारा देव’ अशी डाॅक्टरांची प्रतिमा असते. त्यामुळे डाॅक्टरांनी अापल्या अाचरणातून ते दाखवून द्यायचे असते. राष्ट्रीय स्तरावरून अायएमएने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या सूचना केल्या अाहेत. त्यानुसार अनुकरण करावे. डाॅ.राजेश पाटील, सचिव, अायएमए 
बातम्या आणखी आहेत...