आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Increase Heat Waves, Temperature On 43.3 Degree Celsius

वाऱ्याने वाढवली झळांची तीव्रता; पारा ४३.२ अंशांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उष्णतेच्या लाटेमुळे राज्य होरपळून निघत असताना, गुरुवारी अचानक वाऱ्याचा वेग वाढला. अार्द्रता जेमतेम ११ टक्के असताना वाऱ्याचा वेग ताशी १५ किलाेमीटरच्या पुढे गेल्याने उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढली हाेती. त्यामुळे तापमान ४३.२ अंशापर्यंत गेले हाेते. या उन्हाळ्यातील एप्रिल महिन्यातील हा उच्चांक नाेंदविला गेला. वाऱ्याच्या वेगामुळे तापमान ४३.२ असतानाही दुपारी वाजता त्याची तीव्रता ४५ अंशावर असल्याची नाेंद खासगी हवामानाच्या संकेतस्थळावर करण्यात अाली हाेती.

शहरात गुरूवारी सकाळी १० वाजेलाच ३९ अंशांवर तापमान हाेते. सकाळी ताशी किलाेमीटर वेगाने वारे वाहिले. तर दुपारी १२ वाजेनंतर वाऱ्याचा वेग तापमान झपाट्याने वाढले. दुपारी वाजता ताशी १५ किलाेमीटर वेगाने वारे वाहिले. उन्हाच्या झळांचा रस्त्यावर परिणाम दिसून अाला. महामार्गाने ये-जा करणारे दुचाकीस्वार उन्हाच्या झळांमुळे महामार्गालगतच्या उपनगरांमधील रस्त्याचा अाधार घेत हाेते. महामार्गावर देखील दुपारी २.३० वाजता अनेक वाहने काही वेळ रस्त्याच्या कडेला थांबली हाेती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट दिसत हाेता.

पाण्याच्या कमतरतेने झाडे काेमेजली
वसंतऋतूमध्ये वृक्षांना नवीन बहार अाला असला, तरी चैत्रातील असह्य ऊन, उष्णतेच्या झळा अाणि पाण्याची कमतरता यामुळे अनेक झाडे काेमेजली अाहेत. माेठ्या झाडाची पाने सुकली अाहेत. झाडांना प्रकाश संश्लेषणासाठी अावश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा तापमान अधिक असल्याने झाडांवर परिणाम झाला अाहे.
उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी जुन्या जळगावातून जाणाऱ्या व्यक्तीने कुलरचा टप चक्क डोक्यावर घेतला होता.

दुपारी दवाखान्यांमधील गर्दी अाेसरली
उष्णतेच्यालाटेचा अाराेग्यावर विपरीत परिणाम झाला अाहे. विशेषत: लहान मुलांच्या अाराेग्यावर त्याचा परिणाम दिसून येत अाहेे. परंतु, रुग्णालयांमध्ये दुपारी गर्दी नव्हती. उपचारासाठी रुग्णालयात येणारे पेशंट सकाळी ११ ते १२ वाजेपूर्वी येत असल्याने दुपारी १२ ते सायंकाळी वाजेपर्यंत दवाखान्यांमध्ये दाखल पेशंटशिवाय बाहेरचे पेशंट येेत नसल्याची स्थिती अाहे.