आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजिंठा हौसिंग सोसायटी घरफोडीतील आरोपी अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. त्यामुळे आरोपींच्या शोधकामी लागलेल्या तपास यंत्रणेच्या जाळ्यात अजिंठा हौसिंग सोसायटीत झालेल्या घरफोडीतील आरोपी भूषण ऊर्फ जिगर रमेश बोंडारे सापडला आहे. या चोरट्याकडून घरफोडीतील माल हस्तगत करण्यात आला असून, इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अजिंठा हौसिंग सोसायटीतील रहिवासी दिनेश प्रतापसिंग सेठिया यांच्या घरी १६ ते २० एप्रिलदरम्यान घरफोडी झाली होती. त्यात ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, हेडकॉन्स्टेबल मंगलसिंग पाटील, भास्कर पाटील, रवींद्र घुगे, शरद भालेराव, सुधाकर अंभोरे, संजय पाटील, मिलिंद सोनवणे, विनायक पाटील, नरेंद्र वारुळे विजय पाटील यांच्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू होता. यादरम्यान उमाळा येथील भूषण ऊर्फ जिगर रमेश बोंडारे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत ६१,६४६ किमतीचा मुद्देमाल आणि १,६४६ रुपये रोख काढून दिले.
बातम्या आणखी आहेत...