आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेहत्या नकाेय, मग शेतकरी अात्महत्या कशी चालते? अजित पवार यांचा भाजपला सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाराेळा - ‘चाय पे चर्चा’ अन् ‘मन की बात’ करणारे केंद्र व राज्य सरकार हे दळभद्री अाहे. सरकारला गाेहत्या चालत नाही, मग शेतकऱ्यांची अात्महत्या कशी चालते?’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  रविवारी पाराेळा येथील सभेत भाजप सरकारला केला.  
 
‘भगव्या याेगीला कर्जमाफीसाठी फक्त १६ दिवस लागतात. मात्र, जॅकेटवाल्या फडणवीसांना ३० महिन्यांत या विषयावर अभ्यास करता येत नाही, याचीच खंत वाटते. केंद्र व राज्यातील सरकार हे फसवे व संवेदना बाेथट झालेले अाहे. शेतकऱ्यांचा ७/१२ एकदाचा काेरा करा अन‌् खर्चाच्या अाधारभूत दीडपट ठाेस हमीभाव द्या, पुन्हा अाम्ही कर्जमाफी मागणार नाही. उत्तर प्रदेश, अांध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांना शेतकरी कर्जमाफी करण्याचे जमते मग महाराष्ट्र सरकारला का नाही?’ असा सवालही पवारांनी केला.  गेल्या तीन वर्षांत महागाई, बेराेजगारी वाढली, नाेटबंदीचा त्रास झाला तरी जळगाव जिल्ह्यात सर्वच निवडणुकांमध्ये लाेक  भाजपलाच मते देतात, याला काय म्हणावे. या जिल्ह्यात तीन मंत्री असताना काय ठाेस कामे झाली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.    
 
काेपर्डीसारखे पेटून उठा : कर्जबाजारीपणामुळे राज्यात २१ वर्षांची मुलगी अात्महत्या करते ही बाब अस्वस्थ करणारी अाहे. जनतेने या विषयावर काेपर्डी प्रकरणासारखे पेटून उठले पाहिजे, असे अावाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ. सतीश पाटील यांनी केले.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, संघर्ष यात्रा: शिवसेना मंत्र्याच्या गावात विराेधकांची बैलगाडी यात्रा
बातम्या आणखी आहेत...