आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांच्या भेटीनंतर बदलला राष्ट्रवादीचा सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मुख्य राजकीय विरोधक असूनही महापालिकेत सत्ता स्थापनेपासून खाविआसोबत असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक यापुढे महापालिका सभागृहात खाविआच्या विरोधात भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. विरोधक आहात तर तीच जबाबदारी चांगल्या पद्धतीने बजवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या जनता दरबारात दिल्या. निधीसह विविध मागण्यांसाठी नगरसेवकांनी त्यांच्याकडे व्यथा मांडल्या.

महापालिकेची निवडणूक लढविण्यापासून तर सत्ता स्थापन करण्यापर्यंत राष्ट्रवादीची खान्देश विकास आघाडीशी छुपी युती आहे, असेच चित्र शहरात होते. मात्र, यापुढे राष्ट्रवादी प्रत्येक वेळी सत्ताधा-यांना धारेवर धरण्याच्या तयारीत असल्याचे चित्रं निर्माण होत आहे. अर्थात काही विषयांना विरोध करण्यापासून ही सुरुवात होईल. गाळे लिलावाच्या विषयाला राष्ट्रवादी कॉँग्रेसने विरोध दर्शविला आहे.

विरोधकांची वाढेल ताकद
राष्ट्रवादीने विरोधाची भूमिका घेतल्यास विरोधी नगरसेवकांची ताकद वाढणार आहे. भाजप, मनसे या विरोधीपक्षासोबत गेल्याने नगरसेवकांचे संख्याबळ सत्ताधा-यांपेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे विरोध निर्णायक ठरू शकतात. तिघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न यापूर्वी झाला होता. मात्र, राष्ट्रवादीने खाविआला मदत करण्याची भूमिका घेतली होती.

...अन् पुन्हा भूमिका बदलली
गाळे विक्रीच्या विषयाला सभेत विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीने भूमिका बदलून लेखी पत्र देत विषयाला पाठिंबा असल्याचे सागिंतले. गुरुवारी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा भूमिका बदलून गाळे लिलावाला विरोध कायम राहणार असल्याचे सांगितले. वारंवार भूमिका बदलाचे राजकारण मात्र अद्याप पुढे आले नाही.

अजित पवारांनी भेटीत दिला कानमंत्र
राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे, महानगर युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष नीलेश पाटील, चंद्रकांत कापसे, राजू मोरे, शरीफ पिंजारी, अतुल बारी, शिवा शिंदे, दुर्गेश पाटील, सचिन सनकत, अभिषेक मोरे यांनी गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनता दरबारात भेट घेतली. गाळे लिलावाप्रमाणे विरोधातील इतरही विषयांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात विरोध करावा, अशा सूचना पवारांनी दिल्या.

विरोध करण्याच्या सूचना
सभागृहात विरोधक म्हणून काम करा. अयोग्य विषयांना विरोध करून विरोधकांची जबाबदारी योग्यरितीने पार पाडण्यास सांगितले आहे. निधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांचे पालकमंत्र्याशी बोलणे झाले आहे. - सुरेश सोनवणे, गटनेता राष्ट्रवादी कॉँग्रेस.