आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajit Pawar News In Marathi, Agriculture Country, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी - पवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - ‘भारत हा कृषी प्रधान देश शेतक-यांच्या जीवावर पोट भरत आहेत. बळीराजा सुखी राहिला तरच जनता सुखी राहू शकते. दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या तालुक्यांसाठी राज्यशासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील,’ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यातील १२३ तालुके परिस्थितीनुसार दुष्काळी जाहीर केले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत पुन्हा प्रत्येक तालुक्यांचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही पवार यांनी या कार्यक्रमात सांगितले.

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष ठरलेले आहेत. ज्या तालुक्यांमध्ये ५० टक्कयांपेक्षा कमी पाऊस व पैसेवारी जाहीर होईल. ते तालुके दुष्काळी जाहीर होतील, कोणावरही अन्याय होणार नाही. असे पवार यांनी सांगितले.

याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री संजय सावकारे, आमदार राजीव देशमुख, जलि्हा बँकचे संचालक प्रदीप देशमुख, जलि्हाध्यक्ष गफार मलिक,डॉ. अस्मिता पाटील, उदेसिंग पवार, केदारसिंग पाटील,रविंद्र भैय्या पाटील, दिनेश पाटील, श्याम देखमुख, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, मधुकर चौधरी, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, शशिकांत साळुंखे, रामचंद्र जाधव, दिलीप चौधरी अशोक खलाणे,आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वरखेडे लोंढे प्रकल्पाच्या कामाविषयी अजित पवार यांनी माहिती देतांना सांगितले की, या कामाला 1997-98 मध्ये 75 कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु पर्यावरण मंत्रालयाची तांत्रिक मान्यता न मिळाल्याने हे काम रखडले होते. परंतु आमदार राजीव देशमुख यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाच्या कामासाठी कें द्रीय जल आयोगाची व इतर मान्यता मिळाल्याने या कामाला गती देण्याचे प्रयत्न केले आहेत. वाढत्या महागाईमुळे प्रकल्पाच्या बांधकामाची किंमत वाढून ती 2011-12 मध्ये 461 कोटीवर गेली आहे. परंतु यापुढे निधीच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाच्या कामासाठी नेमण्यात आलेला ठेकेदाराकडून हे काम तीन वर्षात पूर्ण होऊ शकते. परंतु त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. पैशांचे सोंग करता येत नाही. तरी देखील या कामासाठी पैसे कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले.

मन्याडची उंची वाढवावी
मन्याड धरणाची उंची वाढविल्यास त्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वाचवता येईल. त्यामुळे परिसरातील शेतक-यांना लाभ होऊ शकतो. तसेच शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतक-यांना निकषाप्रमाणे आर्थिक मदत मिळावी अशी विनंती आमदार राजीव देशमुख यांनी अजित पवारांकडे केली.