आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजितदादांच्या मुक्कामाने वाढली उत्कंठा, सर्किट हाऊसवर ठरली कॉँग्रेसला रोखण्याची व्यूहरचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेत निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती होण्याची भीती व्यक्त होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात रात्रीचा मुक्काम करून राजकीय उत्कंठा वाढविली आहे. या मुक्कामामुळे अजित पवार यांनी स्वत: निवडणुकीत लक्ष घातल्याचा संदेश गेला आहे. यातून कॉँग्रेसला धडा शिकविण्याची खेळी होऊ शकते, असे संकेत मिळायला लागले आहेत. जाहीर सभेत विरोधकांना थेट अंगावर न घेणार्‍या अजित पवार यांनी रात्रीच्या बैठकीत कूटनीतीचा अवलंब करीत बरीच खलबते केल्याचे पुढे यायला लागले आहे.
त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या आज (दि.13) होणार्‍या सभेकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री कॉँग्रेस नेत्यांना काही टीप देतात काय, हेही यातून दिसणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा होत असल्यामुळे धुळे शहराच्या महापालिकेची निवडणूक अटीतटीची होईल, असेच चित्र दिसत आहे. राज्यस्तरावर मित्रपक्ष म्हणून एकत्र नांदणार्‍या कॉँग्रेस व राष्ट्रवादीतच मतांची विभागणी झाल्यास त्याचा फायदा कोणाला होईल, याचीही चर्चा शहरात रंगत आहे.

पुढील स्लाइडमध्ये,
महापालिकेकडे नागपूरमधून लक्ष