आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhil Bharatiya Hindi Sahitya Samelan In Jalgaon From Today

अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे आजपासून आयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हिंदी साहित्य गंगा संस्था खान्देश एकता साहित्य मंडळ यांच्यातर्फे ११ १२ एप्रिलदरम्यान अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपतीनगरातील हॉटेल क्रेझी होममध्ये संमेलन होईल. या वेळी स्वागताध्यक्ष दलिचंद जैन तर संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर मेश्राम असतील. तसेच उद‌्घाटन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
संमेलनाला नागालॅण्ड, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब यासारख्या ठिकाणाहून १५० साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. प्रथम दिवशी मंदागिनी स्मारीका पुस्तकाचे प्रकाशन, झील का दर्पण गीत गझल संग्रह प्रकाशन, शब्द मोहिनी सामुहिक काव्य संग्रह, अनुराग काव्य संग्रह प्रकाशन, दुपारी ते ४.३० वाजेदरम्यान ‘हिंदी का वैश्विक परिदृश्य, समय, समाज, साहित्य और उसमे स्त्रियो का स्थान’, ‘भारतीय संस्कृती का विकास’ यावर परिचर्चा, मानव अधिकार विषयावर व्याख्यान, संध्याकाळी ५.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर कवी संमेलन होईल.
१२ रोजी सकाळी १०.३० वाजता गंगा ज्ञानेश्वरी गौरव पुरस्कार वितरण, दुपारी ते ४.३० वाजेदरम्यान परिचर्चा, संध्याकाळी ५.३० वाजता स्थानीय बहुभाषिक कवी संमेलन मुशायरा हिंदी, उर्दू, मराठी भाषेतून होणार आहे. मध्य प्रदेशचे डॉ. अमित शुक्ला, पटीयालाचे सागर सुद, डॉ. रमेश कटारीया, कानपूरचे डॉ. विजय त्रिपाठी, राजस्थानच्या डॉ. आशा पांडे, दिल्लीचे मंजूळा दास, विशाखापट्टणम‌्चे डॉ. शीशा रत्नम‌्, नागालॅण्डचे डॉ. पी.बी. फिलीप, बाबु देव्वाल, जे.के.डागर, डॉ. पुनम शर्मा उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला अध्यक्षा डॉ.प्रियंका सोनी, सचिव प्रकाश कोठारी, उमेश सोनी, सीमा दोशी, प्रा.डॉ.भास्कर पाटील, डॉ.खालीद सय्यद, आशा जाधव उपस्थित होते.