आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकुलकर खूनप्रकरणी पाचही संशयित निर्दोष, पुराव्याअभावी मुक्तता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिवाजीनगरातील सुभाष भानु दास आकुलकर (सुभाष चिकन्या) खूनप्रकरणी पाचही संशयितांची न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी सबळ पुराव्याअभावी पोलिस तपासातील त्रुटींमुळे निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल सोमवारी दिला. संशयितांमध्ये बाळू ऊर्फ विशाल भाऊसाहेब इंगोले, सुरेश मधुकर सोनवणे, प्रवीण मुकुंद शिंदे, कमलेश रवींद्र जैस्वाल अशोक नाना शिंदे यांचा समावेश आहे.
सुभाषचा खून घरापासूनच काही अंतरावरील मोकळ्या जागेत २३ डिसेंबर २०१२ रोजी रात्री १०.३० वाजता झाला होता. घटनेच्याच दिवशी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली होती. त्यानंतर शिंदे या पाचव्या संशयितालाही अटक केली. चार वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्यातील निकालाची मोठी उत्सुकता होती. फिर्यादी पक्षाचे वकील ढाके यांनी ७२ पानी लेखी युक्तिवाद सादर केला. तर बचाव पक्षानेही तांत्रिक मुद्यांच्या आधारावर खटला चालवला.
न्यायालयाने पाचही संशयितांना निर्दोष मुक्त केल्याचा निकाला दिला. फिर्यादी तथा मयत सुभाषची बहिण सुरेखा आकुलकर यांच्यातर्फे अॅड. महेश ढाके, सरकारतर्फे अॅड.एस.बी.सूर्यवंशी तर बचावपक्षातर्फे अॅड. प्रकाश बी.पाटील अॅड. पंकज अत्रे यांनी काम पाहिले आहे.
दोषींना शिक्षेसाठी उच्च न्यायालयात मागणार
अटक केलेल्या संशयितांकडून जप्त केलेले त्यांचे कपडे, शस्त्रांवर सुभाषच्या रक्ताशी मिळते-जुळते रक्ताचे डाग आहेत. रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवालात तसे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संशयितांना शिक्षा होणे अपेक्षित होते. जिल्हा न्यायालयाच्या निकालाच्या प्रती मिळाल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. अॅड.महेश ढाके, फिर्यादीचे वकील
बातम्या आणखी आहेत...