आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद, असत्य, अन्याय याविरुद्ध युद्ध म्हणजे जिहाद, अल इन्साफ पब्लिक फाउंडेशनतर्फे ईदगाह मैदानावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जगातिजहाद हा इस्लामला बदनाम करतोय. प्रत्यक्षात सत्य, अन्याय आणि दहशतवाद राेखण्यासाठी लढले गेलेले युद्ध म्हणजे 'जिहाद’ हाेय, असे प्रतिपादन कानपूर पीठाचे शंकराचार्य स्वामी लक्ष्मीनारायण यांनी केले. अल इन्साफ पब्लिक फाउंडेशनतर्फे ईदगाह मैदानावर रविवारी सायंकाळी वाजता घेण्यात अालेल्या अाॅल खान्देश इन्सानियत परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत हाेते.
या वेळी जैन धर्मगुरू प्रेमचंद बरडिया, फाउंडेशनचे मुफ्ती सालीम यमनी, अामदार सुरेश भाेळे, ज्येष्ठ पत्रकार िवद्याधर पानट, िजल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, करीम सालार, गफ्फार मलिक, गनी मेमन, फारूख शेख, गीता कपूर कंवरलाल संघवी, दीपक जाेशी उपस्थित हाेते.

स्वामी लक्ष्मीनारायण म्हणाले, दाेन समाजातील तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना समाजातून दूर केले पाहिजेे. मुस्लिम फक्त अल्लाहची पूजा करतात. त्यामुळे ते वंदे मातरम् म्हणत नाहीत. कारण इस्लाममध्ये केवळ अल्लाहच पूजनीय अाहे. इस्लाम हा बदला घेणारा नव्हे तर माफ करणारा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.

अल इन्साफ पब्लिकेशन फाउंडेशनतर्फे घेण्यात अालेल्या अाॅल खान्देश इन्सानियत परिषदेवेळी ‘हम सब एक हैं’ चा नारा देताना करीम सालार, संजय साेनवणे, मुफ्ती अब्दुल्लाह फुलपुरी, स्वामी लक्ष्मीनारायण, मुफ्ती सालीम यमनी

मनुष्य सारखेच : मुफ्ती अब्दुल्लाह
पवित्रकुराण ग्रंथात सांिगतल्याप्रमाणे अल्लाहने प्रत्येक मनुष्याला सारखेच स्थान िदले अाहे. काेणालाही उच्च नाही, काेणालाही निच नाही. काही समाजकंटकांमुळे दाेन धर्मांमध्ये तेढ िनर्माण हाेतो, असे मुफ्ती अब्दुल्लाह यांनी सांगितले.

एकत्रयेण्याची गरज : मुफ्ती यमनी
जगातपसरलेल्या अशांततेमुळे सर्व धर्मीयांनी तेढ सोडून एकत्र येण्याची गरज अाहे. त्याचे कार्य वरिष्ठांनी िदलेल्या अादेशावरून सुरू केले अाहे. देशातील प्रत्येक गावात अल इन्साफ फाउंडेशनची स्थापना करण्याचा अामचा मानस अाहे. त्यामुळे देशभरात शांतता िनर्माण हाेईल. सर्व एकत्र अाले नाही तर देशाचे तुकडे हाेण्यास वेळ लागणार नाही, असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुफ्ती सालीम यमनी यांनी सांगितले.

अफवांमुळे दंगली होतात : सुपेकर
वाद,दंगली हे काेणत्याही धर्मासाठी फायद्याच्या नसतात तर काही समाजकंटकांनी केलेल्या कृत्यामुळे सर्वांना परिणाम भाेगावे लागतात. अनेक दंगली या अफवा पसरल्याने हाेेतात. समाजातील एक टक्का लाेक उपद्रवी असतात. त्यांच्यामुळे अशांतता पसरते. त्यामुळे अशा समाजकंटकांना शाेधण्याची गरज असल्याचे पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.

सर्वांचीच जबाबदारी : अामदार भाेळे
दाेनधर्मांत तेढ िनर्माण हाेऊ नये, शांतता असावी हे केवळ धर्मगुरूंची नव्हे, तर ही सगळ्यांची जबाबदारी अाहे. काेणत्याही धर्मातील केवळ टक्के खराब लाेकांमुळे सर्वधर्माला अापण खराब म्हणू शकत नाही. त्यामुळे सर्वांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे अामदार भाेळे यांनी सांिगतले.