आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधीनगरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त, मुद्देमालासह नऊ जण ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव - शहरात दारूच्या भट्ट्या फक्त कंजरवाड्यात आहेत, हा दावा बुधवारी रामानंदनगर पोलिसांनी राजीव गांधीनगरात केलेल्या कारवाईमुळे फोल ठरला. राजीव गांधीनगरात पोलिसांना घरांमध्येच दारूच्या भट्ट्या आढळून आल्या. या कारवाईत हजार ६०० लिटर रसायन, साडेसहाशे किलो कोळसा आणि १७ टाक्या असा एकूण सुमारे लाखाच्या मुद्देमालासह जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या दारूच्या भट्ट्यांबाबत पोलिसही अनभिज्ञ होते.
रामानंदनगर पोलिसांनी मुख्यालयातील पोलिसांच्या राखीव तुकडीसह बुधवारी सकाळी वाजता समतानगरात कोम्बिंग ऑपरेशन केले. त्यात शोभाबाई अशोक सोनवणे आणि प्रदीप संतोष सपकाळे या दोघांकडे गावठी दारूचा साठा सापडला. त्यानंतर पोलिसांनी हरिविठ्ठलनगर परिसरातील राजीव गांधीनगरकडे मोर्चा वळवला.

शहरातील कंजरवाड्यात गावठी दारूच्या भट्ट्या आढळणे नित्याचेच झालेले आहे. याशविाय शहराबाहेरच गावठी दारू तयार केली जाते, असा पोलिसांचा समज होता. मात्र, बुधवारी तो फोल ठरला. सकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडलिे, दिलीप पाटील, सुजाता राजपूत, श्यामराव पवार, प्रदीप चौधरी, शरद पाटील, किरण पाटील, हितेश बागुल, महेंद्रसिंग पाटील, सुरेश मेढे आणि मुख्यालयाच्या पथकाने राजीव गांधीनगरात केलेल्या कारवाईत तीन घरांमध्ये दारूच्या भट्ट्या आढळून आल्या.

छायाबाई रमेश सकट (वय ४५), कलाबाई शिवलाल लोंढे (वय ५०) आणि पार्वताबाई प्रल्हाद भदाणे (वय ४५) यांच्या घरात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा साठा सापडला. त्यात हजार ६०० लिटर रसायन, नवसागर, दारूचा गूळ, साडेसहाशे किलो कोळसा आणि दारूच्या भट्टीसाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. तसेच या दारू भट्ट्यांच्या मालकीण असलेल्या तिघींसह नारायण तुकाराम तायडे, अशोक धामणे, राजेंद्र खुशाल ठोंबरे कैलास शालकि साेनवणे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, पोलिस यंत्रणाही दारूच्या या भट्ट्यांविषयी अनभिज्ञ होती.

पोलिसही अनभिज्ञ
प्रत्येकपोलिस ठाण्यात गोपनीय विभाग, गुप्त वार्ता विभाग आणि गुन्हे शोध पथक असते. पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणत्या ठिकाणी अवैध धंदे चालतात, याची सर्व माहिती या पथकांना असणे गरजेचे आहे. मात्र, खेदाची बाब म्हणजे राजीव गांधीनगरात गावठी दारूच्या भट्ट्या आहेत याची माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्यातील कोणालाही नव्हती, याचे सर्वांना आश्चर्य वाटतेय. बुधवारी केलेल्या कारवाईमुळे या सर्व बाबी समाेर आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...