आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ विभागातही गावठी हातभट्टीचा महापूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मुंबईतगावठी विषारी दारू पिऊन नागरिकांचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला गावठी हातभट्टी दारू बंद करण्यात यश अालेले नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघासह भुसावळ, यावल, रावेर अाणि बोदवड तालुक्यांत गावठी हातभट्टीचा महापूर आला अाहे. पोलिस अाणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धाक संपल्याने दारूच्या गुत्त्यांसह अवैध धंदे राजकिय वरदहस्तामुळे राजराेसपणे सुरू आहेत.
भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे, कन्हाळे, शिवपूर कन्हाळे, किन्ही, साकरी, साकेगाव, खंडाळे, मोंढाळे, सुसरी, कुऱ्हे पानाचे, चाेरवड, सुनसगाव, बेलव्हाय, वराडसिम, मन्यारखेडा, कंडारी, तळवेल, हतनूर यासह यावल तालुक्यातील कासवा, दुसखेडा, पाडळसे, मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यांतील तापी-पूर्णा नदीच्या काठावरील सर्वच गावांमध्ये गावठी हातभट्टी दारूचा महापूर वाहत आहे. यात अनेक गोरगरिब, कष्टकरी, शेतमजूर गावठी दारूच्या विळख्यात अडकले असून अनेक संसारांची राखरांगोळी झाली आहे. वेल्हाळे गावाची लोकसंख्या केवळ हजार असून मतदारांची संख्या १४०० ते १४५० इतकी आहे. या गावात तब्बल १३ गावठी दारूचे गुत्थे अाहेत. दरमहा पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्काचे कर्मचारी येतात आणि चिरिमिरी करून निघून जातात. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री एकनाथ खडसे यांचे भुसावळ विभागावर कटाक्षाने लक्ष असते. अशा स्थितीतही पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क गावठी हातभट्टीचे थैमान रोखू शकत नसल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे खडका, किन्ही अाणि शिवपूर कन्हाळे या शिवारात असलेल्या एमआयडीसीच्या खोलगट भागांतील झाडाझुडुपांतही गावठी हातभट्टी दारूच्या भट्ट्या सर्रासपणे लावल्या जात आहेत.

मजदूर संघाचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
भारतीयमजदूर संघाचे भुसावळ तालुकाध्यक्ष प्रकाश केऱ्हाळकर यांनी गावठी हातभट्टीच्या दारूचे समूळ उच्चाटन होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ खडसे यांना पत्रव्यवहार केला आहे. गावठी दारूमुळे पाडळसे, कासवा, दुसखेडा परिसरात अनेक शेतमजुरांचा संसार विस्कळीत झाला अाहे. दारूविक्रेत्यांना पोलिसांचे समर्थन असल्याने हा धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
ठरावानंतरही कारवाई शून्यच
वेल्हाळेसारख्याछोट्या गावात १३ हातभट्टी दारूविक्रेते आहेत. कायद्याचा धाक संपल्याने राजरोस दारू विक्री होते. यामुळे अनेक संसार देशोधडीला लागले. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला अाहे. मात्र, कारवाई शून्य असल्याचा अतिशय खेद वाटताे. विजयपाटील, नागरिक, वेल्हाळे, ता.भुसावळ
बातम्या आणखी आहेत...