आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alcohol Selling Stop From Five Months In Duskheda

दुसखेड्यात तब्बल पाच महिन्यांपासून दारूविक्री बंद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरानजीकतापी नदीकाठावरील दुसखेड्यात महिलांचा पुढाकार, अखिल भारतीय उपभाेक्ता उत्थान संघटनेच्या भुसावळ शाखेने केलेल्या मार्गदर्शनाने दारू बंदी झाली अाहे. गेल्या पाच महिन्यांपासून गावात दारूविक्री हाेत नसल्याने उद्ध्वस्त संसार पुन्हा रुळावर येऊ लागले अाहेत.

यावल तालुक्यातील दुसखेडा, कासवे, पाडळसे या गावांमध्ये वर्षभरापूर्वी गावठी दारू तयार करण्याच गुत्थे हाेते. मानवी जीवाला अपायकारक ठरणारी रसायने वापरून या ठिकाणी दारू गाळली जायची. सुखी संसार उद‌्ध्वस्त हाेण्याचे प्रमाण वाढल्याने महिला हतबल झाल्या हाेत्या. ही बाब गांभीर्याने घेऊन अखिल भारतीय उपभाेक्ता उत्थान संघटनेच्या माध्यमातून सर्वप्रथम जनजागृती करण्यात अाली. गांधीगिरी मार्गाचा अवलंब करून दारू विक्रेत्यांना खजिल करण्यासाठी गुलाबपुष्पही देण्यात अाले. मात्र, निलाजरेपणाने त्याकडे दुर्लक्ष करून मुजाेर दारू विक्रेत्यांनी अापले उद्याेग सुरूच ठेवले हाेते. पाेलिसांनाही वारंवार निवेदने देऊन उपयाेग शून्य असल्याने दुसखेड्यातील संतप्त महिलांनी पदर खाेचला अाणि नदीपात्रातील १५ ते २० हातभट्ट्या जमीनदाेस्त करून धडा शिकवला अाहे.

महिलांनी रुद्रावतार घेतल्याने दारू विक्रेत्यांची अनेकदा पाचावर धारण बसली. अाता गेल्या पाच महिन्यांपासून दुसखेड्यात दारूनिर्मिती िवक्री पूर्णपणे बंद झाली अाहे. त्यांचा अादर्श घेऊन अाता परिसरातील अन्य गावांच्या महिलांनीही अाता पदर खाेचून नदी काठावरील हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची माेहीम उघडली अाहे.
सपकाळे, तायडे, माेरेंचे नेतृत्व
दारूबंदीच्या माेहिमेेचे नेतृत्व सुनीता सपकाळे, जिजाबाई तायडे, जया मोरे यांनी केले. त्यांना मिलिंद सपकाळे, याेगेश सपकाळे या हरहुन्नरी युवकांचीही खंबीर साथ लाभली. कालांतराने हळूहळू अनेक महिला साेबत अाल्याने लाेकचळवळ उभी राहिली. प्रकाश केऱ्हाळकर, अॅड. उदय चाैधरी, संजय देशमुख यांचेही त्यांना सहकार्य लाभले.
कासवे, पाडळसातही जनजागृती उपक्रम सुरू
दुसखेड्याचा अादर्श घेऊन कासवे पाडळसा येथेही भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय उपभाेक्ता उत्थान संघटनेच्या माध्यमातून दारू बंदीसाठी जनजागृती केली जात अाहे. पाेलिसांनाही यासंदर्भात पत्र देण्यात अाले अाहे. अांदाेलनाचीही तयारी सुरू अाहे. मध्यंतरी दाेन ठिकाणी झाडाझुडुपात लपून तयार केलेले दारूचे अड्डेही महिलांनी उद‌्ध्वस्त केले अाहेत.
चळवळ हाेणार
दुसखेड्यातदारू बंदी करण्याची चळवळ यशस्वी झाली अाहे. ती निरंतर पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. अन्य गावांमध्येही महिला अाक्रमक झाल्या अाहेत. पाेलिसांना निवेदने देऊन जागरूक केले जात अाहे. अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेतली जात अाहे. प्रकाशकेऱ्हाळकर, तालुकाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ