आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाला शिवीगाळ, मारहाण; मद्यपी तरुण अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेल्वेस्थानक परिसरात शहर पाेलिस ठाण्याच्या बिट मार्शल ड्यूटीवर असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर दुचाकी घालून शिवीगाळ करणाऱ्या मद्यपी तरुणाविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात अाला अाहे. दरम्यान, या अाराेपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना वरीष्ठ अधिकाऱ्यासमाेर त्याने पाेलिसास मारहाण केली.   
 
रविवारी रात्री साडेअाठ वाजेच्या सुमारास सुधीर संजय सावळे माेहसीन फारुख बिराजदार हे दाेघे पाेलिस कर्मचारी रेल्वेस्थानक परिसरात गस्तीला गेले हाेते. या वेळी गणेश भास्कर नन्नवरे याने सावळे यांना दुचाकीने धडक दिली वाद घालून शिवीगाळ केली. त्यांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याने पाेलिसांना धक्का दिला. या वेळी ताे खाली पडला त्याच्या डाेक्याला दुखापत झाली. त्याला शहर पाेलिस ठाण्यात डीवायएसपी सचिन सांगळे यांच्यासमोर गाेंधळ घालून पाेलिसांना शिवीगाळ केली. तसेच पोलिस ठाण्याच्या भिंतीवर डाेके अापटून घेतले. त्याला पाेलिस व्हॅनमध्ये बसवून वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेत सावळे यांना कानशिलात लगावली. या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवला अाहे. 
 
गणेशवर तीन गुन्हे 
गणेशनन्नवरेवर सार्वजनिक शांततेचा भंग करणे, पाेलिसांशी वाद घालण्याचे तीन गुन्हे दाखल अाहेत. तसेच तीन वर्षापूर्वी पोलिस वासुदेव मराठे यांच्याशीही वाद घातला हाेता. 
बातम्या आणखी आहेत...