आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेट सदस्य निवडणुकीचा बिगुल लवकरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तरमहाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची मुदत ऑगस्टमध्ये संपणार आहे. त्यामुळे १५ जुलैपर्यंत निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन सिनेट सदस्य विराजमान होतील.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राज्यपाल कुलगुरूंसह ९१ सिनेट सदस्य आहेत. सभागृहात विद्यार्थीहिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिनेटचे काम सुरू असते. तसेच विद्यापीठाचा नवीन कायदा तयार आहे. मात्र, अद्याप तो पारित झाल्यामुळे जुन्या कायद्यानुसारच ही सिनेट सदस्यांची निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी व्यवस्थापन परिषदेची एक सभा होणे बाकी असून, ती १५ जुलैपूर्वी घेण्यात होईल. त्यानंतर लगेच निवडणुकीचा िबगूल वाजेल. शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पदवीधर गटातील १० जागांसाठी राजकीय पक्षांचे उमेदवार चांगलीच रंगत आणतात. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, युवा सेना या प्रमुख पक्षांच्या विद्यार्थी संघटना या निवडणुकीत मोठ्याप्रमाणात कस लावतात.
गेल्या महिन्यात पदवीधर विद्यार्थ्यांसह प्राध्यापक मतदारसंघातील नवीन मतदारांची नोंदणी संपली आहे. त्यामुळे आता विद्यापीठाकडे आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. छाननीअंती वाढीव मतदारांची यादी प्रसिद्ध होईल. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी सुमारे ते हजार मतदार वाढतील, अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे.

नोंदणीने प्रचाराची सुरुवात
सिनेटसदस्य निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी, विद्यार्थी संघटना राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पदवीधर मतदारांच्या नोंदणीतच प्रचाराला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी करत असतानाच आगामी निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. तथापि, जुलै महिन्यात प्रचाराला चांगलाच वेग येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एसएमएसने मतदान घेण्याचा विचार
विद्यापीठाच्याखुल्या निवडणुकांसाठी एसएमएसने मतदान घेण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू आहेत. मात्र, या पद्धतीमुळे मतदान केल्यास त्याचे फायदे तोटे अशा दोन्ही गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने आधीच चाचपणी करावी योग्य असेल तरच नवीन पद्धत अवलंबावी, अशी सावध भूमिका विद्यार्थी संघटनांनी घेतली आहे.
बातम्या आणखी आहेत...