आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alienist Serve News In Marathi, Adolescence Stress Issue In Alienist Serve, Jalgaon

मानसोपचारतज्ज्ञांनी केलेल्‍या सर्वेक्षणात किशोरावस्थाच तणावात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पूर्वी वयाच्या चाळिशीनंतर येणारा तणाव आता वयाच्या तेराव्या वर्षापासूनच यायला सुरुवात झाली असून त्यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक आजाराला बळी पडत असल्याची धक्कादायक बाब मानसोपचार तज्ज्ञ डॉ.पराग महाजन यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील विविध वर्गातील आठवी ते बारावीच्या वर्गातील 5199 विद्यार्थ्यांचा अभ्यास डॉ. पराग महाजन यांनी सलग दोन महिने केला. त्यात त्यांना लेखी तसेच तोंडी प्रश्‍न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांतून विद्यार्थ्यांमधील तणावाची तीव्रता समोर आली आहे. 13 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे प्रमाण 40 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे.
सामाजिक भीतीतून सर्वाधिक ताण
सर्वात जास्त ताण हा सामाजिक भीतीतून म्हणजे कमी गुण मिळाले तर समाज काय म्हणेल, मित्र काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील या भीतीमुळे येत असल्याचे मुलांनी दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे. त्याखालोखाल सामान्य भीतीतून येणार्‍या ताणाचे प्रमाण आहे. सर्वसाधारण मुले ज्या ज्या बाबींना घाबरतात त्याला सामान्य भीती म्हणतात. परीक्षेची भीतीं वाटणार्‍या मुलांनाही ताण येतो; पण त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
दहावीनंतर जास्त वाढतो ताण
इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा ताण प्रचंड वाढतो, असेही समोर आले आहे. त्यात पालकांच्या अपेक्षांची भर पडते. भविष्यात नेमके काय करायचे, या चिंतेतून सर्वाधिक ताण मुलांना जाणवतो, असाही निष्कर्ष आला आहे. एकमेकांशी मनमोकळा संवाद असेल तर ताणापासून मुक्त होता येते, असे डॉ. महाजन यांचे म्हणणे आहे.