आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All India Jain Shvetaanbar,Latest News In Divya Marathi

अ.भा.जैन कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी अनिल देसर्डा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या जिल्हा शाखेच्या नूतन कार्यकारिणीची निवड भारतीय जैन संघटना हॉलमध्ये नुकतीच करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी अनिल देसर्डा, उपाध्यक्ष- प्रवीण पगारिया, सचिव- विशाल बंब, खजिनदार- सचिन बाफना व जनसंपर्क अधिकारी म्हणून लुणेश नाहर यांची निवड झाली. नूतन पदाधिकार्‍यांना प्रेमचंद कोटेचा यांनी शपथ दिली. या वेळी माजी अध्यक्ष विजय लोढा, राष्ट्रीय मंत्री कन्हय्यालाल रुणवाल, महाराष्ट्र प्रदेशमंत्री डॉ.अशोक र्शीर्शीमाळ, सकल जैन संघाचे अध्यक्ष दलिचंद जैन, माजी सचिव विशाल सोमटी आदी उपस्थित होते. याप्रसंगी तालुकाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. जैन समाजबांधवांनी एकत्र येऊन समाजहिताच्या उपक्रमांमध्ये योगदान देण्याचे आवाहन प्रेमचंद कोटेचा यांनी केले.