आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • All Party Members Come Together To Submit Nomination From In Jalgaon District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना, भाजप, मनसे अन‌् राष्ट्रवादी काँग्रेस आले एकत्र !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यात आघाडीत बिघाडी, तर महायुतीत फाटाफूट झाल्यानंतर सर्वत्र चौरंगी पंचरंगी लढती रंगणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळणार आहेत. मात्र, या लढाईची गोड सुरुवात शुक्रवारी जळगाव येथे तहसील कार्यालयात पाहायला मिळाली. अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांचे उमेदवार एकत्र आल्याने बहुतांश जणांनी हस्तांदोलन करत कोणतीही कटुता पाळता गळाभेट घेतली.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी होणार हे निश्चित होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने तयारी केली होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश जैन यांचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे पुत्र राजेश जैन, रमेश जैन, नितीन लढ्ढा, करीम सालार सुनील महाजन यांच्यासह शेकडो शिवसैनिक शक्तिप्रदर्शन करत तहसील कार्यालयात पोहोचले.
त्यापाठोपाठ भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांच्यासोबत आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, अशोक लाडवंजारी, अमित भाटिया आदी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीकडून इच्छुक मनोज दयाराम चौधरी हे काही मोजक्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह आले, तर चित्रा चौकापासून रॅलीच्या माध्यमातून मनसेचे उमेदवार ललित कोल्हे दाखल झाले. या वेळी सर्वच पक्षांचे उमेदवार तासभर एकाच ठिकाणी जमल्याने प्रवेशद्वाराजवळ प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, एका वेळी एकच उमेदवार आत सोडला जात असल्याने इतरांना ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका स्वीकारावी लागली. दरम्यान राजकीय जीवनातील ३० वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदाच आमदार सुरेश जैन हे यंदा स्वत निवडणूक लढत असताना अर्ज दाखल करण्यासाठी हजर राहू शकले नाहीत. घरकुल प्रकरणात कारागृहात असल्याने त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र राजेश जैन, बंधू रमेश जैन पत्नी रत्ना जैन यांची उपस्थिती होती.

वळवींनी साधेपणाने भरला अर्ज
चोपडा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपत दाखल झालेले आमदार जगदीश वळवी यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार हीना गावित यांची विशेष उपस्थिती होती. वळवी यांनी ग्रामदैवत आनंदी भवानी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन अर्ज दाखल केला. त्यांनी शक्तिप्रदर्शन केले नाही.

जळगाव ग्रामीणमध्ये शक्तिप्रदर्शन
धरणगाव येथील मतदारसंघासाठी सात जणांनी ११ अर्ज दाखल केले. त्यात भाजप, राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवारांचा समावेश होता. गुलाबराव देवकर यांच्यातर्फे त्यांचे बंधू गोपाळ देवकर विशाल देवकर यांनी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादी शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेच्या रॅलीस माजी आमदार गुलाबराव पाटील उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. तसेच हॉटेल ढाबेदेखील फुल्ल झाले होते. त्यामुळे हॉटेल ढाबाचालकांची चांगलीच चांदी झाली.

चंद्रकांत पाटलांकडे कोटीची संपत्ती
मुक्ताईनगर शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे एक कोटी २९ लाख ३५ हजारांची स्थावर आणि जंगम मालमत्ता असल्याचा उल्लेख आहे. तसेच त्यांच्यावर विविध वित्तीय संस्थांचे ४९ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज असल्याचाही उल्लेख आहे. मनसे तालुकाध्यक्ष राजेंद्र सांगळकर यांनीही शुक्रवारी अर्ज दाखल केला.

पाचोऱ्यातून कार्यकर्त्यांचे लॉबिंग
पाचोरा येथे राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्याने डॉ.अस्मिता पाटील आमदार दिलीप वाघ यांच्या गटाने शुक्रवारी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग केले. श्रेष्ठींना बंडखोरी होण्याची भीती आहे. शुक्रवारी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार किशोर पाटील यांनी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी शहरातून रॅलीद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
हरिभाऊ जावळे यांनीही दाखल केला अर्ज
रावेर भाजपतर्फे शुक्रवारी माजी खासदार हरिभाऊ जावळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी जावळे यांनी शहरातील पाराचा गणपती मंदिरात जाऊन सपत्नीक पूजा केली. भाजप कार्यकर्त्यांनी पाराचा गणपती मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली. जावळे यांना भाजपतर्फे गुरुवारी रात्री उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे शुक्रवारी त्यांनी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार रक्षा खडसे, सुनील बढे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती हर्षल पाटील, पंचायत समिती सभापती अलका चौधरी, सुरेश धनके, उपनगराध्यक्ष पद्माकर महाजन, मिलिंद वाघुळदे, डॉ.आर.एम.चौधरी, डॉ.विजय धांडे, मानस कुळकर्णी, शिवाजी पाटील, नंदकिशोर महाजन, विलास पाटील, शोभा पाटील आदी उपस्थित होते. रावेरमधून राष्ट्रवादीतर्फे गफ्फार मलिक आणि शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. हे दोन्ही उमेदवार शनिवारी अर्ज भरणार आहेत.

भुसावळात सावकारेंसह जणांचा अर्ज
भुसावळ येथीलविधानसभा मतदारसंघातून माजी पालकमंत्री संजय सावकारे यांनी शक्तिप्रदर्शन करत भाजपतर्फे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी भाजप आणि राष्ट्रवादीतील पालकमंत्री समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. सावकारेंसह एकूण जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारचा मुहूर्त साधला. अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी जामनेर रोडवरील दर्डा बिल्डिंगपासून भाजपची रॅली निघाली होती. ब्राह्मण संघ, जवाहर डेअरी, डिस्को टॉवर, सराफ बाजार, बँक ऑफ महाराष्ट्रजवळून ही रॅली बाजारपेठ पोलिस ठाण्यामार्गे तहसील कार्यालयात गेली. या वेळी संजय सावकारे, रजनी सावकारे, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, सुनील बढे, मुन्ना तेली आदी उपस्थित होते. त्यानंतर सावकारेंनी निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार भांगरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.