आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणी हे भ्रष्टाचारीच, मेहनत न घेताच होतात ‘श्रीमंत’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- राजकारणी हे भ्रष्टाचारी असतात. कोणत्याही प्रकारची मेहनत न घेता ते श्रीमंत होतात. त्यांनी कमवलेल्या पैशांचा विनियोग हा उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केला पाहिजे, असे परखड मत अभियांत्रिकीची विद्यार्थिनी करिश्मा सुनील माळी हीने व्यक्त केले.

क्रांतीसूर्य महात्मा फुले बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे वरणगावात माळी समाजातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी गौरव करण्यात आला. याप्रसंगी मनोगतात करिश्माने सडेतोड मत व्यक्त करून उपस्थित राजकारण्यांना विचार करण्यास भाग पाडले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय सावकारे होते. विधानपरिषद सदस्य मनीष जैन यांच्याहस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर महाजन, धरणगावच्या नगराध्यक्षा पुष्पा महाजन, शालिग्राम मालकर, एकनाथ महाजन, सरपंच रोहिणी जावळे, एपीआय दत्तात्रय परदेशी, अरुणा इंगळे, तोताराम माळी, आर. आर. महाजन, एन.एन.माळी, निवृत्ती माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष संतोष माळी यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत माळी, शिलांबरी जमदाडे यांनी केले. आभार संस्थेचे सदस्य पंकज माळी यांनी मानले.

या गुणवंतांचा झाला गौरव
केतकी माळी, कल्पेश माळी, ज्ञानेश्वर माळी, कामेश माळी, पवन माळी, मेघा माळी, सायली माळी, तेजस्विनी माळी, निकिता माळी, अमोल माळी, आरती माळी, मंगेश माळी, करिश्मा माळी, अश्विनी माळी.

सर्वच राजकारणी भ्रष्ट नसतात
युवकांनी राजकारणात येऊन प्रशासकीय अधिकार्‍यांवर जरब बसवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वच राजकारणी भ्रष्टाचारी नसतात. जे भ्रष्टाचारी असतील त्यांना मतदारांनी त्यांची जागा वेळीच दाखवली पाहिजे. क्रांतीसूर्य महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेने आयटीआय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. त्याला मंजुरी मिळवण्याची जबाबदारी आपली आहे, अशी ग्वाही पालकमंत्री संजय सावकारे यांनी दिली.

हातात आहे खरे लॉजिक
माणसाच्या दोन्ही हातात खरे लॉजिक आहे.नऊचा पाढा दोन्ही हाताच्या बोटांवर आहे, असे आमदार मनीष जैन म्हणाले.

प्रशासकीय सेवेकडे वळा
विद्यार्थ्यांनी राजकारणात सक्रिय न होता प्रशासकीय सेवेकडे वळावे. अभियांत्रिकीचे शिक्षण उद्योगांकडेही वळण्याचा प्रयत्न करावा. महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे कार्य स्तुत्य आहे. संस्थेने भविष्यात जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन मेळावा घ्यावा. त्यासाठी आपण सहकार्य करू, अशी ग्वाही विधानपरिषद सदस्य मनीष जैन यांनी दिली.