आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरातील कुलगुरूंचा व्हॉट‌्सअॅप ग्रुप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यातील वदि्यापीठांच्या कुलगुरूंचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कुलगुरूंमधील समन्वय वाढणार असून, माहितीचे आदान-प्रदान वेगाने होणार आहे. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या सूचनेनंतर हा ग्रुप तयार झाला आहे.
राजभवनातील जेबीव्हीसी (जॉइंट बोर्ड ऑफ व्हाइस चान्सेलर)ची बैठक वगळता कुलगुरूंनी मुंबईत यापुढे कुठल्याही बैठकांना हजर राहणे आवश्यक नाही. समन्वयकांना या बैठकांना पाठवावे सर्व कुलगुरूंनी व्हॉट्सअॅप ग्रुपवरून संपर्कात राहावे, अशी सूचना तावडे यांनी जुलै रोजी झालेल्या बैठकीत केली. या बैठकीस उमवितर्फे कुलसचिव प्रा.डॉ.ए.एम.महाजन उपस्थित होते. कुलगुरूंनी संशोधन आणि उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी अधिक वेळ द्यावा त्यासाठी वदि्यापीठातच राहावे, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

निर्णयाचा वदि्यापीठांना फायदा
मुंबईतझालेल्या बैठकीनुसार सर्व कुलगुरूंचा व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. तसेच वदि्यापीठांना शिक्षण संचालक भेटी देणार आहेत. त्यात घेण्यात येणा-या निर्णयाचा वदि्यापीठांना फायदा होणार आहे. डाॅ.सुधीरमेश्राम, कुलगुरू

राज्यातील सर्व वदि्यापीठांचे अकॅडेमिक कॅलेंडर समान होणार
दहावी-बारावीप्रमाणेराज्यातील सर्व वदि्यापीठांचे अकॅडेमिक कॅलेंडर आता समान राहणार आहे. प्रत्येक वदि्यापीठाची प्रवेशप्रक्रिया, परीक्षा, निकाल जाहीर होण्याच्या तारखा समान राहतील असा प्रयत्न उच्च शिक्षण विभाग करणार आहे. तसेच राज्यातील प्रादेशिक वदि्यापीठांचे सर्व कुलगुरू व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून एकमेकांच्या संपर्कात राहून यासंदर्भात एकमेकांना माहिती मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे कामात सुसूत्रता येईल, तसेच एकमेकांकडे काही योजना, उपक्रम राबवले जात असतील तर, त्याची माहिती देखील कुलगुरूंना चटकन मिळेल. त्यामुळे कुलगुरू व्हॉट्सअॅप ग्रुप हा फार मोठा फायद्याचा ठरणार आहे.


उच्च शिक्षण संचालकांच्या भेटी
आगामीकाळात पुणे येथील उच्च शिक्षण संचालक सर्व वदि्यापीठांचे कुलसचिव सहसंचालकांची बैठक घेणार आहेत. त्यात वदि्यापीठांच्या अडचणींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय काही वदि्यापीठांना संचालक स्वत भेटी देऊन आढावा घेणार आहेत.

रूसा अंतर्गत ३०० कोटींचे पॅकेज
केंद्राच्या‘रुसा’ (राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान)अंतर्गत देशातील ‘ए’ ग्रेडप्राप्त वदि्यापीठ आणि महावदि्यालयांना ३०० कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. यासंदर्भात येणा-या काळात वदि्यापीठांची निवड करून योग्य त्यांना संशोधनासाठी निधी दिला जाईल.
बातम्या आणखी आहेत...