आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य शोधासाठी राज्यभरात चाचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी शिक्षण विभाग जुलैअखेरीस राज्यभरात पायाभूत चाचणी घेणार आहे. मुलांना काय येते, कोठे मदतीची गरज आहे ते शोधण्यासाठी या चाचण्या होणार असल्याचे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे प्रधान सचवि नंदकुमार यांनी आदेश काढले आहेत.

प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी निर्माण करण्यात आली. आता विद्यार्थ्यांना जुलैअखेरीस परीक्षेस सामोरे जावे लागणार आहे; मात्र ही परीक्षा पास-नापास करण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य आणि शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी असेल. ही परीक्षा दुसरी ते आठवीच्या मुलांसाठी असणार असून शिक्षकांनी आपापल्या वर्गात त्या घ्यायच्या आहेत. या चाचणीचा बाऊ होणार नाही, वातावरण आश्वासक असेल, प्रात्यक्षिक, लेखी प्रश्न सोडवताना मुलांना मजा येईल. एखादी येणारी गोष्ट चाचणी देता-देता मूल सहज शिकेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. कोणताही निकाल दाखवण्यासाठी ही चाचणी नाही, तर आपण गुणवत्तेत कुठे आहोत हे तपासण्यासाठी ही चाचणी आहे. मुलांची समज वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे, असेही नंदकुमार यांनी म्हटले आहे.

चाचणीपूर्वी सराव
मुलांचीगणिताची समज, कौशल्ये, विचारक्षमता तपासण्यासाठी वेगळे प्रश्न यात असतील. मुलांना कदाचित या प्रश्नांचे अनुभव याआधी मिळाले नसतील. त्यामुळे प्रश्नांचा चाचणीपूर्वी सराव करून घ्यायचा आहे. चाचण्या गोपनीय नाहीत. विशिष्ट प्रश्नांची उत्तरे पाठ करून घ्यायची नाहीत.
दैनंदिनवस्तूंचा वापर
संख्यांचीसमज तपासताना केवळ संख्येचे वाचन, लेखन तपासण्यापुरते मर्यादित राहता संख्या म्हणजे नेमकी किती? हे शतक, दशक, एकक प्रतिके वापरून दाखवता आले पाहिजे. खोट्या नोटांचा वापर, गठ्ठे, सुटे मणी, फुलांचा माळा यांचा वापर आकडेमोडसाठी करायचा आहे.