आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच बदल्या विभागीय स्तरावरून व्हाव्यात - महसूल राज्यमंत्री संजय राठाेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार विभागीय स्तरावर अायुक्तांना दिले अाहेत. ही स्वागतार्ह बाब अाहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ महसूलच नव्हे तर इतरही विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार विभागीय स्तरावर द्यावे, अशी मागणी महसूल राज्यमंत्री संजय राठाेड यांनी जळगावात पत्रकारांशी बाेलतांना केली.

जळगाव जिल्हा दाैऱ्यावर अालेले राज्यमंत्री राठाेड रविवारी शहरात विश्रामगृहावर थांबले हाेते. महसूल विभागातील मंत्रालय स्तरावर हाेणाऱ्या बदल्यांचे अधिकार काढून विभागीय अायुक्तांना दिल्याने राज्यमंत्री राठाेड नाराज असल्याचे बाेलले जात अाहे. यासंदर्भात थेट त्यांनाच प्रश्न विचारल्यावर त्यांनी मात्र नाराज नसल्याचा दावा केला. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्याने सध्या महसूल विभागाला कॅबिनेट मंत्री नाही. मुख्यमंत्र्यांकडेच महसूल खाते अाहे. महसूलमधील बदल्यासंदर्भांत घेतल्या निर्णरूाबाबत त्यांनी स्वागतार्ह निर्णय असल्याचे सांगितले. गृह विभागाच्याही बदल्या विभागीय स्तरावर झाल्या पाहिजे, अशीही अपेक्षा राठाेड यांनी व्यक्त केली.

शिवसैनिकांची अनुपस्थिती
राज्यमंत्रीराठाेड हे शिवसेनेचे असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते अाणि अामदार हे त्यांच्यासाेबत असणे अपेक्षित हाेते. परंतु, मंत्री राठाेड हे कार्यक्रम आटोपून दुपारी वाजता पद्मालय विश्रामगृहावर पाेहाेचले. त्यांच्या स्वागतासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशिवाय काेणीही नव्हते.

मंत्री राठोड यांच्याकडून गुलाबरावांचे सांत्वन
पाळधी | महसूल राज्यमंत्री संजय राठाेड यांनी रविवारी पाळधी येथे शिवसेनेचे उपनेते अामदार गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. अामदार पाटील यांच्या माताेश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले अाहे. त्यांच्या सांत्वनपर भेटीसाठी मंत्री राठाेड सकाळी १०.३० वाजता द्वारदर्शनासाठी पाळधी येथे अाले हाेते. त्यांच्यासह मध्य प्रदेशातील हारदा येथील अामदार अार.के.दाेगणी, अापचे अामदार अजितसिंग गुजर आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...