आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरच्या नवीन पालिकेच्या वास्तूचे संत सखाराम महाराजांच्या हस्ते हस्तांतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर: आज पालिकेच्या १५३ व्या स्थापनादिनी शहरातील पालिका आवारातील नवीन प्रशासकीय वास्तूत हस्तांतरण  संत सखाराम महाराज गादीपती प्रसाद महाराज यांच्या शुभ हस्ते पालिकेकडे हस्तांतरीत झाले. तीन मजली भव्य सुसुज्ज हायटेक अशी ही वास्तू असून या पालिकेची प्रतिकृती पुण्यातील प्रसिद्ध वास्तूतज्ञ अभिजित शिंदे यांच्या कल्पकतेने साकारली आहे. ८ दिवसात सर्व कॅबीन स्थलांतरित केल्या जाणार आहेत. 

यावेळी प्रारंभी फीत कापून संत सखाराम महाराज गादीपती प्रसाद महाराज यांनी हस्तांतर केले. यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ बी.एस.पाटील, एड. ललिता पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, रामभाऊ संदानशिव, मनोज पाटील, सुभाष भांडारकर, मनोज पाटील, यांच्यासह शहर विकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका आदि यावेळी उपस्थित होते.

टीपी सर्व्हे मधील ६०/१ मधील आरक्षण क्रमांक १०८ मधील व्यापारी संकुल व प्रशासकीय इमारत भूमिपूजन १५ जुलै २०११ रोजी तत्कालीन आमदार साहेबराव पाटील, तत्कालीन नगराध्यक्ष नाना रतन चौधरी, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, तत्कालीन मुख्याधिकारी पी.जि.सोनवणे यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प हा यांच्या उपस्थितीत मंजूर कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. सदर प्रकल्प पूर्ण झाला असून योगायोगाने माजी आमदार पाटील यांच्या पत्नी नगराध्यक्षा आहेत त्यामुळे माजी आमदार पाटील हे देखील उपस्थित होते. आज १५३ व्या दिवशी हस्तांतरण झाले. बीओटी तत्वावरील हे काम पूर्ण झाले असून पालिकेच्या हिश्यात पालिका इमारत व ४५ गाळे पालिकेला मिळणार आहेत. यातून पालिकेला १० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

अशी आहे वास्तू  
५ कोटी ३४ लाख लाख रुपयांची ही वास्तू असून २४ हजार स्क़्वेअर फुट जागेवर तयार केली असून तिला तळमजला दुसरा मजला आणि तिसरा मजला असे तीन मजले आहे. भव्य असा पोर्च उपलब्ध करून दिला असून ३३ फुट लॉबी एरिया आहे. तीनही मजल्यावर स्वतंत्र महिला पुरुष प्रसाधन गृह त्यासोबत दिव्यांग व्यक्तींसाठी त्याठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. जास्त गर्दी असणारे विभाग तळमजल्यावर तर काही विभाग दुसर्या आणि तिसर्या मजल्यावर केले आहेत. 
 
भविष्यात लिफ्ट बसू शकेल अशी व्यवस्था पालिकेसाठी सुविधा आताच करून ठेवली आहे. प्रत्येक मजल्यावर अभ्यागत कक्ष व दालने उभारली आहेत. भव्य प्रशस्त सभागृह, त्यात मंत्रालय पद्धतीची बैठक व्यवस्था केली आहे. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या दालनाला स्वतंत्र एअर कंडिशनर बसविले आहेत. एकूण प्रत्येक विभागासाठी १४ खोल्या तयार करून दिल्या आहेत. मध्यभागी इमारतीला हवा खेळती राहील यासाठी व्हेंटीलेटर्स ठेवण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात नाविन्यपूर्ण अशी ही इमारत असून कदाचित इतकी भव्य हायटेक इमारत एकही नगरपालिकेला नसावी. शासनाच्या अध्यादेशानुसार ८ लाख रुपयांचे फर्निचर करून देणे करारात होते त्यापेक्षाही अधिक फर्निचर विकासकाने उपलब्ध करून दिले आहे
बातम्या आणखी आहेत...