आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी केले अमळनेरच्या मुलाचे अपहरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : अमळनेर येथील डाॅ. निखिल बहुगुणे यांच्या मुलाचे जानेवारी राेजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अपहरण झाले हाेते. मात्र, पाेलिसांनी लावलेल्या सापळ्यामुळे अपहरणकर्त्यांनी मुलाला जानेवारीला पहाटे साेडून दिले हाेते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमळनेर शहरातील अाणि बडाेदा येथील अशा सहा संशयिताना अटक केली अाहे. भिशीमुळे झालेल्या ५० लाखांच्या कर्जामुळे अपहरण केल्याची कबुली त्यांनी पाेलिसांना चाैकशीत दिली. 
 
अमळनेर येथील डाॅ. बहुगुणे यांचा मुलगा पार्थ (वय १२) याचे जानेवारी राेजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ग्लाेबल हायस्कूल जवळून अपहरण केले हाेते. याबदल्यात अपरहणकर्त्यांनी ५० लाख रुपये खंडणीची मागणी केली हाेती. या प्रकरणी जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर, अपर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी एलसीबीचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना याप्रकरणी तत्काळ तपासाचे अादेश दिले हाेते. 
 
त्यांनी पथकाला तपासासाठी पाठविले हाेते. त्यानुसार त्यांनी चार दिवस तपास केल्यानंतर सहा संशयित असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील मुख्य सूत्रधार महेश विनायक खांजाेडकर (बारी, वय ३३, रा. बालाजीपुरा, अमळनेर), सुनील वामन बारी (वय ३६), भरत दशरथ महाजन (२४), शिवम गुलाब शिंगाने (१९), अनिल नाना भील (२०, सर्व रा. अमळनेर), भटू हिरामण बारी (रा. बडाेदा, गुजरात) यांना अटक केली. दरम्यान, अपहरणकर्त्यांचे एन्काउंटर करण्याचे आदेश अधीक्षकांनी काढताच भीतीपोटी अपहरणकर्त्यांनी  मुलाला सोडून दिले होते.
 
तीन दिवस महेशवर पाळत 
अपहरण केल्यानंतर रात्री उशिरा महेश त्याची लाल रंगाची मोटारसायकल घेऊन अाला हाेता. त्या वेळी त्याला तिघे जण महेशला ‘शेठ ’म्हणत हाेते. पार्थ याने पाेलिसांना दिलेल्या माहितीत ज्याला शेठ म्हणत हाेते त्याची माेठी दाढी हाेती असे सांगितले. तसेच त्याने सांगितलेल्या वर्णनावरून अनिल भील याचे जे स्केच बनवले हाेते.
 
या सर्व गाेष्टींचा अभ्यास करून एलसीबीच्या पथकाने तीन दिवस महेशवर पाळत ठेवली. त्याने गुन्ह्यात वापरलेली कार घराच्या बाेळीत लावून ठेवलेली हाेती. तर महेश याला सर्वजण शेठ म्हणतात. त्यामुळे पाेलिसांचा संशय बळावला. 

दीड वर्षापूर्वी महेशने डाॅ. बहुगुणे यांच्याकडे त्याच्या अाईचा इलाज केला हाेता. तेव्हापासून घरात असलेल्या डाॅक्टरांच्या चिठ्ठीवर असलेल्या माेबाइल क्रमांकावर ताे धमक्या देत हाेता. या प्रकरणी अटक केलेल्या फक्त महेशवर यापूर्वी वाळू चाेरीचा गुन्हा दाखल अाहे. इतर संशयितांवर एकही गुन्हा दाखल नाही. 
 
गुन्हा केल्याची कबुली 
महेश हाच मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पक्का झाल्यानंतर पाेलिसांनी साेमवारी रात्रभर त्याच्या घरावर पाळत ठेवली. रात्री ८.३० वाजता महेश अाणि सुनील घरातून गायब झाले. ते रात्री १.३० वाजेच्या सुमारास परत अाले. एपीअाय धारबळे हे त्यांच्या पथकासह मंगळवारी सकाळी ७.४५ वाजता घरात घुसले. त्यांनी अन्न अाैषधी प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून चाैकशी करता बराेबर घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची चाैकशी केली असता त्याने पाच जणांना घेऊन गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पाेलिसांनी तत्काळ एक पथक बडाेदा येथे पाठवून अपहरणकर्ता भटूलाही ताब्यात घेतले. उर्वरीत पाच जणांना अमळनेर येथून अटक केली. 
 
पाेलिसांच्या हालचाली टिपल्या 
अपहरण केल्यानंतर महेश, शिवम अाणि भरत हे पाेलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून हाेते. त्यात महेश हा चाेपडा रस्त्यावरील एका पान टपरीच्या मागे उभा राहून तर इतर दाेघे शहरातील विविध चाैकांमध्ये फिरून लक्ष ठेवत हाेते. त्यामुळे त्यांना पाेलिसांच्या हालचाली टिपता येत होत्या.