आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरण, अमळनेर रात्री १० नंतर बंद; धडक माेहीम राबवणार, चार संशयित अाराेपींना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुभाष चौकात पसरलेला शुकशुकाट. - Divya Marathi
खुनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुभाष चौकात पसरलेला शुकशुकाट.
अमळनेर - अमळनेर शहर रात्री १० वाजताच बंद करण्यात येईल. सर्व हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांवर करडी नजर राहील, अाठ दिवसांत धडक माेहीम राबवून कठाेर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाेलिस अक्षीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, चार अाराेपींना अटक केली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक विनयकुमार चाैबे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

सुभाष चौकात साेमवारी रात्री दिनेश सोनार या तरुणाचा खून झाला. याप्रकरणी मंगळवारी विक्की जाधव, डॅनी ऊर्फ आकाश जेधे, सनी जाधव, कालू वस्ताद ऊर्फ राजेश बापाजी दाभाडे, बुद्धा ऊर्फ नितेश विकास जाधव, किशोर जाधव, राकेश यांच्यासह इतर दोन-तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यात आकाश जेधे, नितेश जाधव, राजेश बापाजी दाभाडे, राकेश यांना अटक केली आहे.

विशेष पाेलिस महानिरीक्षक चाैबे दुसऱ्यांदा अमळनेरात दाखल झाले. त्यांनी बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. पोलिस अधीक्षक सुपेकर, अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे दिवसभर शहरात होते .

दुसऱ्या गटाने फिर्याद दिली. त्यात बुद्धा जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश प्रकाश सोनार, संतोष पाटील, दिनेश पाटील, प्रकाश सोनार त्याचे सोबत इतर दाेनजणांनी आम्ही सुभाष चौकात गप्पा मारत हाेताे. त्यावेळी दिनेशने शिविगाळ करीत पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यात माझे वडील जमिनीवर पडले. प्राणघातक हल्ला केला.त्यांच्याविरोधात भादवि कलम ३०७, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. यात आरोपी दिनेश पाटील यास ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात पाेलिस चाैक्या सुरू
रोज रात्री १० वाजता सर्व शहर बंद झाल्यास गुन्हेगारी नियंत्रणात येणार आहे. आजपासून शहर बंद केले जाणार आहे. यात दोन आरसीपी प्लाटून देण्यात आल्या आहेत. आता शहराचा रिझल्ट हवा आहे. रोज रात्री शहर बंद झाले की नाही याचे रिपोर्टिंग घेतले जाणार आहे. सर्व गुन्हेगारांचे रेकॉर्ड अद्ययावत केले जाणार आहे. यात कोणतेही गैरकाम खपवून घेतले जाणार नाही. शहरातील पैलाड, झामी चौक शहर पोलिस चौक्या सुरु करण्यात येणार अाहेत. पोलिस कर्मचारी त्याठिकाणी दिसायला हवे आहेत. कोंबिंग, चेकिंग, नाकाबंदी केले जाणार आहे. असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नसल्याचे सुपेकर यांनी सांगितले.

पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
गावातखून झाल्याने दिवसभर तणावसदृश वातावरण होते. मृत दिनेश साेनार याच्यावर धुळे शासकीय महाविद्यालय येथे शवविच्छेदन करून व्हिसेरा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. वाजेच्या सुमारास दिनेशवर पैलाड भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पानखिडकी भागातील इतर नातेवाईक यांची प्रचंड गर्दी उसळली होती. मृताचे शव आणल्यानंतर मागेच डीवायएसपी रमेश पवार, पोलिस निरीक्षक विकास वाघ, एपीआय उदयसिंह साळुंखे दोन पोलिस पथक यांच्या निगरानीखाली ही अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी तणावसदृश परिस्थिती जाणवत होती शहरात संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...