आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरात संत सखाराम महाराज यात्रोत्सव; सर्व जातिधर्म संभाव जोपासणारा उत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला अडीचशे वर्षांची परंपरा लाभली असून यंदा यात्रोत्सवात वॉकीटोकीचा वापर तर महाप्रसादासाठी १० रुपयात ना नफा ना तोटा तत्वावर बेसनाचे लाडू भाविकांना वाटप करण्यात येथील अशी माहिती संत सखाराम महाराज संस्थानचे गादिपती प.पु.प्रसाद महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
 
येथील वाडी संस्थानच्या त्यांच्या निवासात सायंकाळी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यात्रोत्सव हा सर्व जातिधर्म संभाव जोपासणारा उत्सव असून हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी सर्व नागरिक प्रयत्न करीत असतात यंदा सर्व सुविधा असून २४ तास पाणीपुरवठा व यात्रेचे नियोजन करून सर्वत्र साफसफाई झाली आहे. अशी सफाई कधीही ५० वर्षात झाली नाही. यात सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी, कर्मचारी सहभागी होत असतात. फिरस्तीच्या माध्यमातून जमा होणारी दक्षिणा अन्नदानासाठी वापरण्यात येते. गुलाल निधी बंद करून ज्याला कोणाला दक्षिणा द्यायची असेल तर त्यांनी संस्थानच्या कार्यालयात जमा करावी. अध्यात्म भौतिक आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा समन्वय साधत हा उत्सव पार पाडला जातो. यंदा जवळपास ३ लाख भाविक भेट देतील अशी अपेक्षा आहे. यंदा यात्रेचे स्वरूप देखील मोठे राहणार आहे. २५ वॉकीटोकी चाचपणी वरून करून संपर्क साधला जाणार आहे. याची चाचपणी प्रथम करण्यात येत आहे. अशी माहितीही दिली.  
बातम्या आणखी आहेत...