आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amalner Taluka : If Sugarcane Campaisation Not Gaven ,I Will Committee Suicide ,say Farmer

अमळनेर तालुका : ऊसाची भरपाई न दिल्यास आत्मदहन करण्‍याचा शेतक-याचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील शेतकरी हेमंत गुलाबराव पाटील यांच्या मांडळ शिवारातील वीज कंपनीच्या तांत्रिक बिघाडाने दुर्घटना होऊन उसाचे पीक जळाले. या बाबीला 4 वर्षे होऊनही कंपनीने अद्याप मदत दिली नाही. वारंवार तक्रारी करूनही कंपनी शेतकर्‍याला नुकसान भरपाई देत नाही, यासाठी पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

हेमंत पाटील यांच्या मांडळ शिवारातील गट नं. 73/2 या क्षेत्रात 1 हेक्टर 20 आर ऊस लागवड केली होती. 24 ऑक्टोबर 2009 रोजी वीज कंपनीच्या शॉर्ट सर्किटने पूर्ण ऊस जळून खाक झाला. या बाबीचा पंचनामा महसूल व कृषी विभागाने केला असता याबाबतची कागदपत्रे वीज कंपनीच्या धरणगाव कार्यालयात सादर केली. त्यात धरणगाव उपविभागाचे कार्यकारी अभियंता गौतम गायकवाड यांनी सरासरी टनेज अँव्हरेज मागितला. यासाठी शिरपूर सहकारी साखर कारखान्याने 65 टन असा शॉर्टकट दाखला दिला. मात्र ही गोष्ट कार्यकारी अभियंता स्वीकारत नाहीत व नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास आपणास आत्मदहन करावे लागेल, असा इशारा हेमंत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

निरीक्षकांनी मान्य केली चूक
जळगाव येथील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या उद्योग निरीक्षकांनी 1 ऑक्टोबर 2010 रोजी पत्र पाठवून ही कंपनीची चूक मान्य केली आहे. सहायक विद्युत निरीक्षक के.व्ही. सगरे(चाळीसगाव)यांनी चौकशी करून त्यात 11 के.व्ही. वाहिनीचा डिस्क तुटल्याने मोठय़ा ठिणग्या उसाच्या कापलेल्या कोरड्या पिकावर पडली. मात्र वीज कंपनी अधिकारी भारनियमन 12 वाजता सुरू झाल्याचे सांगत होते. परंतु इन्शुलेटर तुटून स्पार्किंग झाल्याचे उपकेंद्राच्या लॉगशिट नोंदीवरून निदर्शनास येते, असा अहवाल दिला आहे. त्यामुळे चूक वीज कंपनीचीच आहे.