आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप काळातही अमळनेर टॅक्सी युनियनची माफक दरात सेवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - ऐन दिवाळीत एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी बेमुदत संप पुकारल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाश्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अशा विदारक परिस्थितीत प्रवाशांकडून हवे ते पैसे उकळण्याची संधी असताना अमळनेर टॅक्सी युनियनने आहे तेच भाडे आकारून प्रवाशांना प्रामाणिकपणे सेवा देत अाहेत. टॅक्सीच्या सेवेमुळे धुळे, चाेपडा, शिरपूर, शिंदखेडा येथे जाणाऱ्या प्रवाशांची अजिबात गैरसाेय झालेली नाही. यामुळे युनियनचे अध्यक्ष बंडू केळकर टॅक्सी मालक चालकांचे कौतुक हाेत आहे. 
 
दिवाळीत एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी राज्यव्यापी संप पुकारल्याने सर्व खाजगी प्रवासी वाहनधारकांना ऐन दिवाळीत मोठे भाडे आकारून पैसे कमाविण्याची संधीच एकप्रकारे उपलब्ध झाली अाहे. अनेक खाजगी वाहनांनी एकप्रकारे प्रवाशांची लुबाडणूकच सुरु केली आहे. मात्र टॅक्सी युनियनचे अध्यक्ष बंडू केळकर यांनी प्रवाशांच्या हिताचा विचार करून कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. 
 
इतरांनीही आदर्श घ्यावा 
खाजगीगाड्या, लक्झरी वाहनांमध्ये दिवाळी लग्नसराईत भरमसाठ भाडे वाढ केली जात असल्याने प्रवाशांना भुर्दंड बसत असतो. ट्रॅव्हल्स चालक पुणे, मुंबईसाठी भरमसाठ भाडे आकारात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर अाहे. त्यांनी अमळनेर टॅक्सी युनियनचा आदर्श घ्यावा. 
बातम्या आणखी आहेत...