आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट महिला कैदी; अधिकारी, कर्मचार्‍यांच्या 24 जागा रिक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदी ठेवण्याची क्षमता 973 आहे. त्यामध्ये महिला आणि पुरुष बंद्यांची अनुक्रमे 34 आणि 939 अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कारागृहात 78 महिला व 987 पुरुष बंदी आहेत. क्षमतेपेक्षा अधिक बंदी झाल्याने त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी करागृह व्यवस्थापनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

1966 मध्ये अमरावतीत मध्यवर्ती कारागृह स्थापन झाले. 16 एकर जागेत कारागृह आहे. बंदी ठेवण्याची क्षमता 973 आसताना प्रत्यक्षात 1065 बंद्यांना ठेवण्यात आले आहे. याचा ताण कर्मचार्‍यांवर पडत आहे.

कर्मचार्‍यांची 24 पदे रिक्त
कारागृहात कर्मचार्‍यांची 148 पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात 123 कर्मचारी, अधिकारी येथे काम करतात. सध्या अतिरिक्त अधीक्षकाची मुख्य पदे रिक्त आहेत. प्रशासन अधिकारीही येथे नाही. या मुख्य पदांसह एकूण 25 कर्मचार्‍यांची कमतरता आहे.

पद मंजूर पदसंख्या सद्य:स्थिती
अतिरिक्त अधीक्षक 1 रिक्त
प्रशासन अधिकारी 1 रिक्त
तुरुंग अधिकारी र्शेणी-2 8 2 रिक्त
लिपिक 9 6 रिक्त
रक्षक 77 10 रिक्त
कृषी अधिकारी 1 रिक्त
शिक्षक 1 रिक्त
परिचालक 1 रिक्त
बेकरी निरीक्षक 1 रिक्त

शासनाकडे प्रस्ताव पाठवला
कारागृहात कर्मचारी आणि अधिकार्‍यांची संख्या कमी असल्याने सध्या कार्यरत कर्मचार्‍यांवर ताण येतो. रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, असा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आहे. शासनाकडून मान्यता मिळताच पदभरती करण्यात येईल. या संदर्भात पाठपुराव सुरू आहे.
-हरीदास कुंटे, वरीष्ठ तुरुंग अधिकारी