आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ambedkar Birth Anniversary Celebrated In Jalgain

अपूर्व उत्साह, जयभीमच्या जयघोषाने शहर दणाणले, साडेदहाला पहिली मिरवणूक डाॅ.अांबेडकरांच्या पुतळ्याजवळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जातिभेद, अन्यायाच्या पाशातून मुक्त करणाऱ्या डाॅ.बाबासाहेब अांबेडकरांची १२५ व्या जयंतीनिमित्त भीमसागराने गुरुवारी शहरातील प्रमुख रस्ते खच्चून भरले हाेते. भीमसैनिकांचा उत्साह, ढाेल-ताशांचा गजर, विद्युत राेषणाईचा प्रकाश, भीमगीतांच्या फैरी, डी.जे.चा अावाज या सर्वांतून पावलाेपावली जयभीमाचा गजर एेकू येत हाेता.
विविध काॅलन्यांमधील डाॅ.बाबासाहेब अांबेडकर मित्र मंडळांच्या मिरवणुका रेल्वेस्थानकाजवळील डाॅ.बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडे जाण्यासाठी रांगेत १०.३० वाजेपासून रांगेत लागल्या हाेत्या. शिवाजी पुतळा, शिवाजीनगर उड्डाणपूल, जुने जळगाव, सुभाष चाैक चित्रा चाैकमार्गे मुख्य मिरवणूक मार्गावर दाखल झाल्या. मात्र, भीमसैनिकांमध्ये असलेला प्रचंड उत्साह, जयभीमाच्या जयघाेषात संभाजीनगर मित्र मंडळाची पहिली मिरवणूक १०.३० वाजता रेल्वेस्थानकाजवळील डाॅ.अांबेडकरांच्या पुतळ्याजवळ पाेहोचली. त्यापाठाेपाठ शिवाजीनगर, राजवाडा मित्र मंडळ, शनिपेठेतील भीमज्याेती तरुण मित्र मंडळ,
शिवाजीनगरातील इंद्रप्रस्थनगर परिसर मित्र मंडळ, परिवर्तन मित्र मंडळ, हुडकाेतील भीमाई मित्र मंडळ अादी मंडळ हाेती. सर्वात शेवटी म्हणजे रात्री ११ वाजता रामेश्वरनगरातील सिद्धार्थ मित्र मंडळ गांधी मार्केटजवळ हाेते.

अांबेडकरांच्या कार्याची माहिती
मंडळांच्या सजवलेल्या वाहनांवर डाॅ.बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणाऱ्या अारास हाेत्या. यात बाबासाहेबांनी समाज परिवर्तन समाजप्रबाेधनासाठी केलेल्या कार्यासाेबत संविधाननिर्मितीसाठी दिलेले याेगदान, विदेशातील कार्य, चित्रफिती सजीव अारास यांचा समावेश हाेता. चित्रप्रदर्शनींद्वारे जीवनपट उलगडून दाखवण्यात अाला हाेता.

ठिकठिकाणी मंडळांचे स्वागत
मिरवणूकमार्गात अाप्पासाहेब भालेराव, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अादी राजकीय पक्षांसह विविध संस्था संघटनांच्या माध्यमातून भीमसैनिक मंडळांचे सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत हाेते. रात्री १२ नंतर डिजे बंद करण्यात आला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भीमगीतांवर जल्लोष करताना भीमसैनिक.