आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"नेकी कर, कचरे में डाल' गाव व्हावया निरोगी, सुंदर सुधारावे लागेल एकेक घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्वच्छभारत अभियानांतर्गत शनिवारी आमदार, जिल्हाधिकारी, उद्योगपतींच्या नेतृत्वाखाली अख्खे जळगावकर हातात झाडू घेऊन साफसफाईसाठी रस्त्यावर उतरले होते. स्वच्छतेसाठी नागरिकांचा उस्फूर्त सहभाग पाहून शहरात एका नव्या पर्वाला प्रारंभ झाल्याचा आशावाद निर्माण झाला होता. मात्र हा आशावाद दिवसभरच टिकला. सकाळी मोहिम संपताच साफसफाई केलेल्या घाणेकर चौक ते टॉवर चौक या जागी सायंकाळी कचरा इतस्तत: विखुरलेला दिसला. रविवारी सकाळी शहरातही जागोजागी कचरा दिसून आला,त्यामुळे नेकी कर आणि कचरे में डाल असाच प्रकार घडल्याचे प्रत्ययास आले.
"स्वच्छताइव्हेंट'
पंतप्रधानमोदींच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेची शनिवारी जळगावात सुरुवात झाली.महापौर राखी सोनवणे, िजल्हाधिकारी रुबल अग्रवाल, आमदार सुरेश भोळे, पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, उद्योगपती अशोक जैन यांच्यासह शहरातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी घाणेकर चौकात स्वच्छतेची शपथ घेतली होती. त्यानंतर या सर्व मंडळींनी घाणेकर चौक ते टॉवर चौक या भागात सफाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर "दिव्य मराठी' चमूने रविवारी सकाळी घाणेकर चौक, टॉवर चौक, फुले मार्केट या शहरातील मध्यवर्ती भागातून फेरफटका मारला असता पुन्हा पूर्वीचेच चित्र दिसून आले. फेरीवाले, हातगाडीवाले, व्यापाऱ्यांनी कचरा रस्त्यावरच टाकल्याचे दिसले.हे पाहता स्वच्छता ही एक दिवसाचा इव्हेंट होता नागरिकांनाच आता स्वच्छतेची सवय लावून घ्यावी लागणार आहे.
कच-याचे आगार
गोलाणीमार्केट, फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, बी.जे.मार्केट यासह अन्य मार्केट.
स्वच्छतेसाठी असा लागू शकतो आपला हातभार
घरातील घरासमोरील कचरा बाहेर टाकता कुंडीतच टाकावा.
साफसफाई करताना कचरा, पालापाचोळा, उरलेले अन्न गटारीत टाकू नये.
दुकानदारांनी कागद, प्लास्टिक पिशव्या, कचरा डस्टबिनमध्येच टाकावा.
भाजी फळविक्रेत्यांनी घाण उचलून कचराकुंडीत टाकावी.
कचराकुंडी भरल्यास नगरसेवक, आरोग्य विभागात तक्रार करावी.
मार्केटमधील स्वच्छतेच्या नियोजनासाठी असोसिएशनने पुढाकार घ्यावा.
आपल्या घराप्रमाणेच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी.
अस्वच्छता करणाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी.
शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांनी स्वत:हून पुढाकार घेत आठवड्यातून एकदा स्वच्छता मोहीम राबवावी. यामध्ये नागरिकांनाही सहभागी करून घ्यावे. मनपाच्या जुन्या जागेच्या साने गुरुजी रुग्णालयात जागेवर कचरा जाळुन टाकला त्यामुळे तेथील नागरिकांना धुराचा माेठया प्रमाणात त्रास होत होता. प्रभाग एकमध्ये नवीपेठ, बळीरामपेठ, शनिपेठ, पोलनपेठ, दाणाबाजार, मार्केट परिसर.प्रभाग तीनमध्ये तांबापुरा, सिंधी कॉलनी, कासमवाडी, जानकीनगर, मेहरूणचा काही भाग प्रभाग दोनमध्ये बालाजीपेठ, पांजरपोळ, वाल्मीकनगर या दाट वस्तीच्या परिसरांचा समावेश आहे.