आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ambulance News In Marathi, Ambulance Shortage In Jalgaon, Divya Marathi

शववाहिकेविना पार्थिवांची उपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था काही रुग्णालये, सेवाभावी संस्था आणि राजकीय पक्षांनी केली आहे. मात्र, एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला गावी परत नेण्यासाठी जिल्ह्यात जैन इरिगेशनशिवाय कोणाकडेही शववाहिका नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे शववाहिका उपलब्ध नसल्याने अनेकवेळा मृतदेहांची हेळसांड होते. शिवाय या अडचणींचा फायदा खासगी वाहतुकदार घेतात. मृताच्या नातेवाइकांकडून ते अवाच्या सव्वा भाडे वसूल करतात.

मृताच्या नातेवाइकांना भुर्दंड
आरोग्य विभाग, महापालिका, नगरपालिका, राजकीय पक्ष अथवा अन्य सेवाभावी संस्थांनी शववाहिकेची व्यवस्था करावी अशी सातत्याने मागणी होत असली तरी याकडे सर्वांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातून उपचारासाठी रुग्ण मोठय़ा संख्येने जळगाव शहरात येतात. एखाद्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका तयार होत नाही. त्यामुळे नाइलाजाने जादा पैसे खर्च करून मृतदेह घेऊन जावा लागतो. यासाठी पक्षांनी पुढाकार घेऊन शववाहिका उपलब्ध करून द्यावी.

वाहतुकदार घेतात फायदा
शहरातील केवळ मोजकेच रुग्णवाहिका चालक आणि खासगी वाहतुकदारच मृतदेह घेऊन जाण्याची जबाबदारी घेतात. मात्र त्याचे भाडे दुपटीने घेतात. मृतक एखाद्या गरीब कुटुंबातील असेल तर त्याची विचित्र अवस्था होते. महामार्गावर रोजच अपघात होतात. त्यात मेलेल्यांना शववाहिका नसल्याने अनेक तास रखडत ठेवावे लागते.

वैद्यकीय क्षेत्राचा विकास झाला
जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राचा विकास विकास झाला. पाचशेहून अधिक खासगी अत्याधुनिक रुग्णालये उभारली आहे. पूर्वी रुग्णांना उपचारासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकला जावे लागत होते. मात्र आता त्या सुविधा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. मात्र एकाही रुग्णालयाकडे शववाहिका उपलब्ध नाही.

सेवाभावी संस्थेकडून मागणी
शववाहिका घेण्यासंदर्भात पक्षातर्फे तशी तरतूद नाही. मात्र एखाद्या सेवाभावी संस्थेमार्फत सोय करण्यासाठी प्रयत्न करणार. भविष्यात पक्षाकडून शववाहिका मिळण्यासाठी प्रय} करणार. डॉ.ए.जी. भंगाळे, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

मागणी केली आहे
जिल्ह्यात फक्त जैन इरिगेशन कडे एक शववाहिका आहे. जिल्ह्यासाठी त्याची मागणी आम्ही केली आहे. शिवाय महापालिकेलाही शववाहिका घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. डॉ. एस. एन. लाळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक

एकच शववाहिका शोकांतिका
जिल्ह्यात एकच शववाहिका असणे शोकांतिका आहे. खरेतर आरोग्य विभागाने याची पूर्तता केली पाहिजे. मात्र ते करीत नाहीत. शिवसेनेतर्फे शववाहिकेसाठी प्रयत्‍न करणार. किशोर पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना.