आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारात महाराष्ट्र सरकार नंबर वन, अमित शहा यांचा आघाडी सरकारवर हल्‍लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- आघाडीसरकारने 15 वर्षांत राज्याला लुटले असून कृषी, औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचे वैभव हरवले आहे. त्यामुळे भ्रष्टाचारात महाराष्ट्र सरकार नंबर वन होते. याचा विचार करून जनता या निवडणुकीतही बदल घडवेल, असा आशावाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला.
कोळी महासंघातर्फे मंगळवारी महर्षी वाल्मीकी जयंती कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी अध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते. त्यांनी या वेळी भाजपत प्रवेश केला. या वेळी खासदार ए. टी. पाटील, डॉ.गजेंद्र भानजी, उपाध्यक्ष रामकृष्ण केणी, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील, वाडीलाल राठोड, राजहंस टपके, प्रभाकर सोनवणे, सुमन कोळी, अण्णा कोळी, के. बी. साळुंखे, राजेंद्र चौधरी, आनंद खरात उपस्थित होते. कार्यक्रमात भाजपनेच शक्तिप्रदर्शन केले. चाळीसगाव येथे महर्षी वाल्मीकी जयंती कार्यक्रमात बोलताना अमित शहा. व्यासपीठावर ए. टी. पाटील, वाडीलाल राठोड, प्रा.साहेबराव घोडे, रमेश पाटील, प्रभाकर सोनवणे, अण्णा कोळी, उन्मेष पाटील आदी.

दिल्लीत आघाडीचेसरकार असताना पाक सैनिकांकडून सीमेवर गोळीबार सुरू होता. त्याचा अखेरही पाक सैनिकच करीत असत. मोदी सरकार आल्यावर पाक सैनिकांकडून गोळीबार होत असला तरी त्याला चोख प्रत्युत्तर देऊन गोळीबाराचा अखेर भारतीय सैनिक करू लागले आहेत. पूर्वी देशाच्या पंतप्रधानाचा आवाज ऐकू येत नव्हता. आता मोदींचा आवाज तळागाळातील माणसापर्यंत पोहोचतोय. तसेच स्वच्छता अभियान, जनधन योजना राबवली आहे.शरदपवार 10 वर्षे देशाचे कृषिमंत्री असतानाही राज्यात दरदिवसाला शेतक-यांच्या आत्महत्या वाढताहेत, ही चिंतेची बाब आहे. गुजरातमध्ये कोळी समाजाचे स्वतंत्र अस्तित्व असून तेथील भाजप सरकारने कोळी बांधवांना मदतीचा हात दिलाय. हीच मैत्री महाराष्ट्रात कायम ठेवायची आहे.