आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैकशी अायाेगाच्या इमारतीसमाेरच अधिकाऱ्यांसमवेत अमिताभ बच्चन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळेे- शहरात झालेल्या दंगलीची चाैकशी विशेष अायाेगामार्फत केली जात अाहे. त्याचे कामकाज हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत सुरू अाहे. चाैकशी अायाेगाच्या इमारतीसमाेरच या प्रकरणातील अधिकाऱ्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाेबत फाेटाेसेशन केल्याचे छायाचित्र गुरुवारी सरकार पक्षाने सादर केले. अमिताभ यांचा फाेटाे अधिकाऱ्यांबराेबर पाहून अायाेगानेही अाश्चर्य व्यक्त केले. तसेच हे कसे हाेऊ शकते, अशी विचारणाही केली. त्याबाबतची माहिती सरकार पक्ष अायाेगासमाेर देणार अाहे.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कक्षात धुळे दंगल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदीवाल यांच्यापुढे गुरुवारपासून कामकाज सुरू झाले. त्यापूर्वी विविध गटांतर्फे अॅड. प्रकाश परांजपे, अॅड. जी.व्ही. गुजराथी, अॅड. अशफाक शेख, अॅड. समीर पंडित आदींचे युक्तिवाद झाले आहेत. पोलिस पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांचा युक्तिवाद काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांनी गुरुवारी आयोगापुढे विविध गटांतर्फे झालेला युक्तिवाद मुद्देनिहाय खोडून काढण्याचा प्रयत्न केला. दंगल िनयंत्रण करताना पाेलिसांना दाेन्ही बाजूचा िवचार करावा लागताे. त्यामुळे त्यांची स्थिती तराजूसारखी हाेत असते. काही वेळेस एका बाजूला तर काही वेळेस दुसऱ्या बाजूला झुकावे लागते. कारवाई करताना पाेलिसांना कधीही अानंद हाेत नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात अाणण्यासाठी त्यांना कारवाई करावी लागते. या दंगलीत अनेक पाेलिस अॅसिड हल्ल्यात जखमी झाले अाहेत. त्याबाबतची नाेंदही सरकारी दवाखान्यात अाहे. सरकारी यंत्रणा खाेटे बाेलू शकत नाही. त्यामुळे अॅसिड हल्ल्याचा मुद्दा लक्षात घ्यावाच लागेल.

अमिताभ बच्चन उपस्थित
दंगलआयोगाने कामकाजात विविध गटांतर्फे दाखल झालेल्या दंगलीबाबतच्या सीडी ११ ऑगस्टला पाहण्याचे आदेश दिले. त्यासंदर्भात गुरुवारी अॅड. हिरे यांनी युक्तिवादात सांगितले की, सीडींवर कसा विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे. या सीडी केंद्रीय फाॅरेन्सिक लॅबकडून प्रमाणित होऊन आलेल्या नाहीत. संगणकाच्या मदतीने काही बदल सीडीमध्ये करता येऊ शकतात. त्याबाबत त्यांनी चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चनसाेबत अॅड. हिरे, तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत पटील, अधिकारी विकास थोरात आदींसह कर्मचाऱ्यांचा फोटो अायाेगासमाेर सादर केला. संगणकावरील फोटोशॉप सॉफ्टवेअरच्या मदतीने ही कमाल करता येऊ शकते, असे आयोगाला दाखविले. त्यानुसार शुक्रवारी अमिताभ बच्चन बरोबरच्या फोटोसह अर्ज अॅड. हिरे आयोगापुढे सादर करतील.
बातम्या आणखी आहेत...