आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनगटातून अँन्जिओप्लास्टीची यशस्वी शस्त्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खान्देशात प्रथमच १० मिनिटात ९१ वर्षीय रुग्णावर हाताच्या मनगटातून केलेली अँन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्णालयातील आधुनिक सुविधांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.
सावदा येथील रहिवासी भीमराव सपकाळे (वय ९१) हे गेल्या सहा महिन्यांपासून छातीच्या तीव्र दुखण्याने त्रस्त होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. परंतु फारसा फरक जाणवत नव्हता. सपकाळे यांच्या कुटुंबीयांनी औषधोपचारावर विश्वास हाेता. मात्र, वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे पुढील तपासणीसाठी सपकाळे यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणले. या ठिकाणी असलेल्या हृदयालयात भीमराव सपकाळे यांची डी.एम. कॉर्डिओलॉजीस्ट तज्ज्ञ डॉ. आर.बी. गुप्ता यांनी एन्जिओग्राफी केली. त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणारी वाहिनी ९५ टक्के ब्लॉक असल्याचे दिसून अाले.
त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा हाेण्यात अडथळे येत होते. डॉ. गुप्ता यांनी सपकाळे यांच्या कुटुंबीयांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर तत्काळ एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. सपकाळे यांचे वय लक्षात घेता ही शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. तरीही सपकाळे यांच्या कुटुंबीयांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दिला.
जोखमीची पण आवाहनात्मक
रुग्णांच्यानातेवाइकांना वय जास्त असल्यामुळे मनात भीती होती. ती त्यांनी बोलूनही दाखवली. वयोवृद्ध रुग्णांवर औषधींपेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केलेली एन्जिओप्लास्टी ही रुग्णाला हृदयघात इतर आजारापासून वाचवतेच. एन्जिओप्लास्टीसाठी आता जास्त वय असणे हे घाबरण्याचे कारण नाही. डॉ.आर. बी. गुप्ता, डी.एम.कॉर्डिओलॉजीस्ट
मनगटातून शस्त्रक्रिया लाभदायक
चार तासांत सकारात्मक प्रतिसाद
डॉ.गुप्ता यांनी भूल देता सपकाळे यांच्या हाताच्या मनगटातून एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. त्यांना मेटेलीक स्टेंट टाकण्यात आला. अत्यंत जोखमीची असलेली ही शस्त्रक्रिया डॉ. गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे यशस्वी झाली. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चार तासांत सपकाळे स्वत:च्या पायावर उभे राहिले. त्यांच्या कुटुंबीयांनी डॉ. गुप्ता त्यांच्या सहकारी सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबाबत अाभार मानले. रुग्णालयात असलेल्या आधुनिक
सुविधांचे काैतुकही केले.
सपकाळे यांची चाैकशी करताना डाॅ. गुप्ता.
मनगटातून केलेली शस्त्रक्रिया रुग्णांसाठी लाभदायक आहे. यात अतिरिक्त रक्तस्त्रावासारखे धोके लवकर लक्षात येतात. या प्रकारच्या शस्त्रक्रियेत रुग्ण १० मिनिटात सुधारत असतात. याशिवाय रुग्णांना जास्त खर्चही येत नाही. तर रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार योग्यही ठरतो.