आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटीत एका मुलाच्या आईशी लग्न करून अमोलचा समाजासमोर आदर्श

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपळनेर (धुळे)- येथील शिंपी समाजातील अमोल चंद्रकांत जाधव या तरूनाने सत्यशोधक विचाराने प्रेरीत होऊन धनगर समाजाच्या घटस्फोटीत सरला गढरी या मुलीशी आंतरजातीय विवाह करून समाजात एक आदर्श निर्माण केला. अमोलच्या धाडसी निर्णयाचे सर्वच स्थरातून स्वागत होत आहे. पिंपळनेर अंधश्रद्धा निर्मुलन सामितीचे कार्याध्यक्ष सुभाष जगताप यांनी या नवदांपत्याचा शाल, श्रींफळ देऊन सत्कार केला.

आपल्या मुलाचा विवाह हा आंतरजातीय मुलीशी व्हावा आणि हुंडा न घेता पार पडावा अशी आकांक्षा मनात बाळगून निर्धार पक्का करून पिंपळनेर येथीक क्षत्रिय शिंपी समाजाचे चंद्रकांत वंजी जाधव व छाया चंद्रकांत जाधव यांनी आपला मुलगा अमोल याचा विवाह मेहुनबारे ता. चाळीसगाव येथील धनगर समाजातील भगवान कबिरा गढरी व दगुबाई भगवान गढरी यांच्या मुलीशी करण्याचा निश्चय केला.

विशेष बाब म्हणजे सरला ही घटस्फोटित असून तिला चार वर्षाचा मुलगा देखील आहे. असे असूनही समाजात एक आदर्श निर्माण करून इतरांना प्रेरणा मिळावी असा विवाह मोठया जल्लोषात पिंपळनेर येथील बालाजी मंदिरात पार पडला.

यावेळी सरलाचा मुलगा तेजसही उपस्थित होता.
अमोल हा एका पायाने दिव्यांग असून कापड व्यावसायिक आहे. परंतु समाजाचा बदलत चाललेला दृष्टिकोन विवाह होण्यास बाधा निर्माण करत होता. म्हणून अमोलचे मामा मेहुनबारे ता. चाळीसगाव येथे राहत असल्याने त्यांनी अमोलच्या विवाहाचा प्रस्ताव भगवान गढरी यांच्याकडे टाकला त्यास त्यांनी होकार दिल्याने हा आदर्श विवाह पिंपळनेर येथे २१ मे रोजी पार पडला. या आदर्श विवाहाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या विवाहाने मिळाली प्रेरणा
२८ फेब्रुवारी रोजी येथील अहिर सुवर्णकार समाजाचे कुणाल दुसाणे यांनी जातीभेदाच्या साखळ्या तोडुन आंतर जातीय (अनुसूचित जातीच्या) देवयानी नावाच्या मुलीशी विवाह करण्याचा धाडशी पाऊल टाकले होते. त्याला जातपंचायतीच्या नेत्यांना तोंडही द्यावे लागले. पण घेतलेला निर्णय मागे न घेता २८ फेब्रुवारीला त्यांचा विवाह संपन्न झाला.
बातम्या आणखी आहेत...