आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amol Sarafs Paintings Selected For Vietnam's Art Exhibition, Divya Marathi

अमोल सराफ यांच्या तीन पेंटिंग्ज्ची व्हिएतनामच्या कला प्रदर्शनात निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावचे चित्रकार अमोल सराफ यांच्या तीन पेंटिंग्जची निवड आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. व्हिएतनाममध्ये 7 ते 11 मेदरम्यान होणार्‍या ‘युनायटेड नेशन वेसाक उत्सव’ दरम्यान या चित्रांचे प्रदर्शन होणार आहे.
यंदा व्हिएतनाम येथील बाय दिन्ह टेम्पल कन्व्हेन्शन सेंटर, निन्ह बिन्ह प्रोव्हिएन्स या ठिकाणी हा उत्सव साजरा होत आहे. या अधिवेशनात भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांच्या आधारे युनायटेड नेशन मिलेनियम डेव्हलपमेंटचा गोल्स साध्य करणे, बुद्ध संप्रदायाचा प्रतिसाद मिळवणे, ग्लोबल वॉर्मिंग, वातावरण संरक्षणाला प्रतिसाद हे विषय ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भारतातून बुद्धांच्या जीवनावर आधारित 100 पेंटिंग्ज् या उत्सवात ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये जळगावातील अमोल सराफ यांच्या तीन पेंटिग्ज्चा समावेश आहे. मॉडर्न आर्टमधील कंटेम्प्ररी या प्रकारातील ही तीन चित्रे आहेत. झाडांमधील प्रतिमा, मेडिटेशन व राजहंस, बुद्धांची ध्यानस्थ मुद्रा असलेल्या प्रतिमा त्यांनी तैलचित्रात साकारल्या आहेत. अमोल यांच्या पेंटिंग्ज्चे यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर आठ प्रदर्शन आयोजित केले आहेत.