अमरावती- कामावरसातत्याने विलंबाने येणा-या लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यासाठी विद्यापीठातील विविध विभागांत लावण्यात आलेल्या बायोमॅट्रिक्स हजेरी प्रणालीची मदत घेतली जात आहे.
विद्यापीठाच्या सर्वच विभागांमध्ये बायोमॅट्रिक्स हजेरी प्रणाली लावण्यात आली आहे. या माध्यमातून कोणते कर्मचारी महिन्यातून कितीदा विलंबाने येत आहेत, याची माहिती घेतली जात आहे. अनेक कर्मचारी वेळेवर कार्यालयात येतात. बायोमॅट्रिक्स यंत्रात
आपली हजेरी नोंदवतात आणि नंतर निघून जातात. अशा कर्मचाऱ्यांवरदेखील वॉच ठेवण्यात येत आहे. लवकरच या कर्मचाऱ्यांवर संबंधित विभाग प्रमुखांमार्फत कारवाई केली जाईल. िवलंबाने येणाऱ्या किंवा कार्यालयीन वेळेत गायब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांची कामे खोळंबत असतील, तर अशा कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येईल. यापुढे विलंबाने येणाऱ्यांची गय होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपासून परीक्षा विभाग, वित्त विभाग, महाविद्यालयीन विभागातील काही कर्मचारी सातत्याने कार्यालयाबाहेर असल्याची तक्रार कुलगुरूंपर्यंत पोहचली. यावर कारवाई करण्यासाठी ठोस पुरावे गोळ्या करण्यासाठी हा उपाय करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नियमानुसार कारवाई
कार्यालयातसतत विलंबाने येणाऱ्यांबाबत कठोर नियम आहेत. एक महिन्यात सलग तीनदा विलंबाने आल्यास रजा कापण्याचे अधिकारही आहेत. ही कारवाईदेखील नियमानुसारच होणार आहे. दिनेशजोशी, कुलसचिव