आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसपी ऑफिसात जवानाची दांडगाई, डोके आपटले, पोलिसांना धमक्या; अप्पर पोलिस अधीक्षक, महिला कर्मचाऱ्यांशी वाद,

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कौटुंबिकवादाच्या पार्श्वभूमीवर समुपदेशनासाठी बोलावल्याचा राग आलेल्या एका निमलष्करी दलाच्या जवानाने मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तब्बल दोन तास थयथयाट केला. स्थानिक गुन्हे निरीक्षकांच्या केबिनमध्ये डोके भिंतीवर आपटून घेतले; पोलिसांना धमक्या दिल्या. पोलिस अधीक्षक कार्यालयात दुपारी सुमारे दोन-सव्वादोन तास हा गोंधळ सुरू होता. जवानासोबत त्याच्या दोन भावांनीही कार्यालयात दांडगाई केली. गोंधळ घालणारा जवान आणि त्याचे दोन दांडगट भाऊ अशा तिघांना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नंतर रक्तबंबाळ अवस्थेत जवानास जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तिथे जातानाही त्यांनी गोंधळ घातला. दरम्यान, जवानाच्या कमांडिंग अधिकाऱ्यास या सर्व गोंधळाची माहिती देण्यात आली असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रमोद दगा पाटील (वय २८) असे या जवानाचे नाव असून, तो इंडो-तिबेटियन पोलिस दलात (आयटीबीपी) कार्यरत असून, सध्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)मध्ये प्रतिनियुक्तीवर आहे. तो मूळचा भडगावचा निवासी अाहे. विशेष म्हणजे, प्रमोदचा थोरला भाऊ समाधान हासुद्धा लष्करात आहे, तर दुसरा भाऊ निंबा हा एस.टी.मध्ये मुंबईत नोकरीस आहे. मुलगा पाहिजे, या हट्टापायी प्रमोदने आपली पत्नी गायत्री (वय २४) हिला गतवर्षी २७ डिसेंबर २०१५ रोजी घरातून हाकलून दिले होते.

प्रमोद आणि गायत्री यांना तनुजा नावाची एक गोंडस मुलगी आहे. वर्षभरापासून प्रमोद मुलीस सासरी नांदण्यासाठी नेत नसल्याने अखेर गायत्रीचे वडील साहेबराव शिवराम पाटील यांनी महिला साहाय्य कक्षाकडे तक्रार केली होती. प्रमोद सध्या सुटीवर आल्याचे कळताच त्यांनी मंगळवारी गायत्री आणि नातीसह पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले होते. महिला साहाय्य कक्षात समुपदेशनासाठी बोलावल्याचा निरोप आल्यावर प्रमोदचा तिळपापड झाला. मंगळवारी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास प्रमाेद पाटील, माेठा भाऊ समाधान दगा पाटील अाणि दुसरा भाऊ निंबा दगा पाटील एक भाचा यांच्यासह चार जण महिला साहाय्य कक्षात अाले. त्यांच्यात त्या ठिकाणी जाेरात वाद झाले. महिला साहाय्य कक्षातील कर्मचारी सविता परदेशी, वैशाली पाटील यांच्याशी त्यांनी प्रथम वाद घातला.

अप्परपोलिस अधीक्षक, महिला कर्मचाऱ्यांशी वाद : स्थानिकगुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) निरीक्षक राजेशसिंह चंदेल दालनात बसलेले हाेते. त्यांनी दाेघांना त्यांच्या दालनात बाेलावले. चंदेल यांनी प्रमाेद याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्यांच्याशीही वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानक भिंतीवर डाेके अापटून फाेडून घेतले. त्यानंतर दाेन्ही भावांना पाेलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गाडीत (क्र.एमएच-१९/एम-७३७) बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रमाेद अाणि समाधान यांनी गाडीच्या दरवाजाला लाथ मारून काच फाेडली. अप्पर पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील यांनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात घेऊन गेले. त्या ठिकाणीही त्यांनी गाेंधळ घातला. उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी त्यांनी वाद घातला. त्यानंतर दाेघांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेले. त्या ठिकाणीही त्यांनी उपचार करू देण्यास त्रास दिला.

दरम्यान, महिला साहाय्य कक्षात काैटुंबिक वाद मिटविण्यासाठी अालाे हाेताे. मात्र, त्या ठिकाणी पाेलिस अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा अाराेप प्रमाेद अाणि त्याच्या भावांनी केला.

पुढील स्लाईडवर वाचा... एसपी कार्यालयाच्याबाहेर गर्दी, तिघा भावांविरोधात गुन्हा दाखल
बातम्या आणखी आहेत...